Download App

Prakash Raj यांनी केलं ‘विक्रम लँडर’चं तोंडभरून कौतुक! ‘चांद्रयान ३’च्या यशावर म्हणाले…

  • Written By: Last Updated:

Prakash Raj On Chandrayaan 3 Success: देशाच्या यशस्वी ‘चांद्रयान ३’ (Chandrayaan 3) मोहिमेने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ‘चांद्रयान ३’ या मोहिमेचा उल्लेख करत सोशल मीडियावर (Social media) जोक शेअर करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी ‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोचे अभिनंदन केल्याचे बघायला मिळाले आहे.

‘चांद्रयान ३’ बद्दल त्यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर त्यांची प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे. यावेळी मात्र त्यांनी देशाच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल सर्व देशवासियांचे अभिनंदन केल्याचे बघायला मिळाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अर्थात “इस्रो” (ISRO) चे अभिनंदन करताना प्रकाश राज यांनी हा अभिमानाचा क्षण असल्याचे यावेळी सांगितले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये प्रकाश राज सांगितले आहे की, ‘चांद्रयान-३चे यशस्वी ‘लँडिंग’ हा प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाचा क्षण आहे. देशाला हा आनंद देणार्‍या इस्रोचे मनापासून अभिनंदन आणि आभार.’

तसेच त्यांनी इस्रोच्या संपूर्ण टीमचे देखील अभिनंदन केल्याचे बघायला मिळत आहे. हे मिशन पूर्ण करून दाखवल्याने त्यांनी कौतुक केले आहे. या अगोदर अभिनेते प्रकाश राज यांनी एक मीम शेअर करत ‘चांद्रयान ३’ ही मोहीम आणि ‘विक्रम लँडर’बद्दल एक विनोद केलूयचे बघायला मिळाले होते. यावरून त्यांना ट्वीटवर प्रचंड टीकेला सामोरे जावे लागल्याचे बघायला मिळाले होते. तसेच एका चहावाल्याचं कार्टून शेअर करत, विक्रम लँडरचा उल्लेख करण्यात आला होता. त्यांनी हे मीम शेअर केल्यानंतर अनेक संघटनानी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Chandrayan 3 च्या यशानंतर सिद्धार्थ जाधवची खास पोस्ट; ‘आनंद Harry (Potter) पोटात माझ्या…’

परंतु यानंतर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. दुसऱ्या ट्वीटमध्ये प्रकाश राज यांनी सांगितले होते की, ‘द्वेष करणाऱ्यांनाच द्वेष करणारे दिसतात.’ प्रकाश राज यांनी चांद्रयान-३ मोहिमेबद्दल केलेल्या ट्विटविषयी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, आणि कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली होती. इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘विक्रम लँडर’ उतरवून एक अनोखा इतिहास रचला आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०४ वाजता या चांद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.

Tags

follow us