Download App

Prasad Oak: ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण, प्रसाद ओक पोस्ट करत म्हणाला,’….अखेर प्रवास

Prasad Oak On Mahaparinirvana Movie: महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेता म्हणून प्रसाद ओकला (Prasad Oak) ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात राज्य केले. ( Marathi Movie) नाटक, मालिका किंवा चित्रपट, या सर्वच माध्यामातील भूमिकांमुळे तो घराघरात पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून तो महापरिनिर्वाण (Mahaparinirvana Movie) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.


प्रसाद ओकने नुकतंच सोशल मीडियावर (Social media) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो पाठमोरा दिसत आहे. त्याच्या शर्टावर काहीतरी डाग लागल्याचे बघायला मिळत आहे. तसेच मुसळधार पाऊस पडत असल्याचे देखील दिसत आहे. याला कॅप्शन देत त्याने या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

“महापरिनिर्वाण” आज अखेरीस ४० दिवसांचा अत्यंत अवघड, खडतर असा पण प्रचंड समाधान देणारा शूटिंग चा प्रवास संपला..!! माझ्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार..!माझे सहकलाकार अंजली पाटील, गौरव मोरे, कुणाल मेश्राम, कमलेश सावंत, हेमल इंगळे… तुमचं सेट वरचं सोबत असणं खूप मोलाचं आणि भार हलका करणारं होतं…!! फुलवा… तुझ्यासोबत पहिल्यांदाच काम केलं मी पण खूप मज्जा आली…!!! नितीश नांदगावकर… फार सुंदर सेट्स आणि चंद्रकांत सोनावणे सर… एखादी बाई दागिना कसा मिरवते तसे तुमचे कपडे घालून मिरवावसं वाटलं…!!! वा…!!! वा…!!! माझी मेक अप टीम सलीम, प्रताप, आणि सुन्या तुम्हाला खूप प्रेम…!!! दिग्दर्शक शैलेंद्र बागडे सर
छायाचित्रकार अमर कांबळे आणि निर्माते आशिष सर आणि सुनील सर… तुमच्या कष्टांचं कौतुक करायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे… इतकं perfect काम करणारे निर्माते, छायाचित्रकार आणि लेखक दिग्दर्शक एकत्रपणे फार कमी वेळ अनुभवायला मिळतात…!!! हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय झाला त्याचं श्रेय संपूर्ण टीम ला…!!!

Marathi Movie: मराठी सिनेमा ‘सलमान सोसायटी’चं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला

“महापरिनिर्वाण” सिनेमा

“महापरिनिर्वाण” दिन म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन… 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला होता. तेव्हा घडलेला प्रसंग “महापरिनिर्वाण” या सिनेमाच्या माध्यमातून लवकरच दाखवण्यात येणार आहे.

Tags

follow us