Marathi Movie: मराठी सिनेमा ‘सलमान सोसायटी’चं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला
Salman Society Song Release Out: ‘सलमान सोसायटी’ (Salman Society ) हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) सध्या सोशल मीडिया (Social media) सलमान सोसायटी सिनेमाची (Salman Society Movie) जोरदार चर्चा होत आहे. नुकतेच सिनेमाची गाणी आणि ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. सिनेमाची गाणे चाहत्यांच्या पसंतीत ही उतरले. आज सिनेमातील नवीन गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.
नुकत्याच आलेल्या ट्रेलरमध्ये इमोशन, ड्रामा आणि कॉमेडीची किनार बघायला मिळाली होती. हा सिनेमा समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. ट्रेलरमध्ये शिक्षण घेण्यासाठी एका लहान मुलाची खूप धडपड बघायला मिळत आहे. तीच धडपड आता नवीन गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. या गाण्याचे बोल आहेत, सकाळी लवकर उठायचं असून यात लहान मुलाची आयुष्यासाठीची धडपड दिसत आहे.
या सिनेमात एक महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या देवकी भोंडवे यांनी गायले आहे. भटक्या, अनाथ मुलांची व्यथा सर्वांना समोर यावी. या सिनेमातून प्रबोधन होऊन मुलांना योग्य शिक्षण मिळावे. या उद्देशाने दिग्दर्शक कैलाश पावर आणि निर्मात्यांनी एक छोटासा प्रयत्न केला आहे. अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी’ सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा कैलाश पवार यांनी सांभाळली आहे. निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे आणि वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एटंरप्राईजेसच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
Box Office: बॉक्स ऑफिसवर फुटला ‘टायगर 3’चा बॉम्ब, तिसऱ्या दिवशी इतकी कमाई करत केला रेकॉर्ड सेट
हा सिनेमा शिक्षणावर भाष्य करणारा असून हा सिनेमा 17 नोव्हेंबर 2023 दिवशी सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होणार या टॅगलाईनवर आधारीत आहे. सिनेमाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यांनी दिले आहे. या सिनेमात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका अनोख्या पण महत्वपूर्ण भूमिकेत मनोरंजन करताना दिसणार आहे.
तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. सिनेमामध्ये उपेंद्र लिमये पाहुण्या भूमिकेत आहे. तसेच सिनेमामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदी कलाकार मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.