Parinirvana:”…अंत नसून हा आरंभ”; प्रसाद ओकच्या आगामी चित्रपटाची पहिली झलक समोर

Parinirvana:”…अंत नसून हा आरंभ”; प्रसाद ओकच्या आगामी चित्रपटाची पहिली झलक समोर

Prasad Oak Marathi Movie Parinirvana : मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) अनेक दर्जेदार मराठी सिनेमे घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत असतो. आता नुकतचं त्याच्या आगामी ‘परिनिर्वाण’ (Parinirvana) सिनेमाचं पहिली झलक चाहत्यांच्या भेटीला आली आहे. ‘परिनिर्वाण’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याला प्रसाद ओकने पत्नी मंजिरी ओकसह अनेकांनी मोठी हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Majja (@its.majja)


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास ‘महापरिनिर्वाण दिन’ असे सांगितले जाते की, ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निर्वाण झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा ‘हा’ ऐतिहासिक क्षण या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

‘परिनिर्वाण’च्या पहिल्या झलकमध्ये ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, संस्थापक, बहिष्कृत हितकारिणी सभा, प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदान अधिकार, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे जनक, हिंदू कोड बिल, राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विषयीच्या गोष्टी त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यामध्ये खूप काही “ऐतिहासिक’ दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले आणि त्या दिवशी सत्य घटनेवर आधारित एका कलावंताच्या आयुष्याचं स्वप्न, प्रेम, त्याग, संघर्ष, दु:ख. जतन केला त्याने इतिहासाचा अमूल्या ठेवा… एक कॅमेरामन, ३ हजार फुटांची रीळ आणि लाखो लोकांबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘निर्वाण यात्रा’.

या चित्रीकरणाच्या उद्देशाने एक चांगलाच झपाटलेला अवलिया कलाकार नामदेव व्हटकर. प्रसाद ओकने ‘परिनिर्वाण’ या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत लिहिलं आहे,”धगधगत्या अग्नीतून नव्या युगाचा प्रारंभ आहे… अंत नसून हा आरंभ आहे…!!! ‘परिनिर्वाण’ लवकरच”. त्याच्या या पोस्टवर जय भीम… अंत नसून आरंभ आहे. हा सिनेमा सर्व भाषांमध्ये दाखवावा, आतुरता, अशा कमेंट्स चाहते करत आहेत.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

तसेच अनेक सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स करत प्रसादला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. ‘परिनिर्वाण’चं पहिली झलक दाखवल्यानंतर हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावर आधारित आहे की नामदेव व्हटकरांच्या? असा सवाल चाहत्यांनी उपस्थित करत आहेत. या सिनेमात प्रसाद ओक आणि अंजली पाटील मुख्य भूमिकेत झळकत असल्याचे दिसून येत आहेत. शैलेंद्र बागडेने कथा, पटकथा लिहिण्याबरोबरच या चित्रपटाचं दिग्दर्शनदेखील केले आहे. तर सुनील शेळके या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube