Kiran Gaikwad: ‘चौक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार? किरण गायकवाडच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

Kiran Gaikwad: सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘तेंडल्या’, ‘बलोच’ हे मराठी सिनेमा सध्या चांगलेच चर्चेत येत आहेत. या सिनेमाना चाहत्यांनी चांगला प्रतिसाद देत असल्याचे देखील दिसून येत आहे. पण याबरोबरच चाहत्यांची गर्दी ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमाकडे जास्त असल्याचे दिसत आहे. या सिनेमाचे सर्व शो हाउसफुल होत आहेत. पण या सिनेमामुळे एका मराठी सिनेमाचे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 13T084402.617

Kiran Gaikwad

Kiran Gaikwad: सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘तेंडल्या’, ‘बलोच’ हे मराठी सिनेमा सध्या चांगलेच चर्चेत येत आहेत. या सिनेमाना चाहत्यांनी चांगला प्रतिसाद देत असल्याचे देखील दिसून येत आहे. पण याबरोबरच चाहत्यांची गर्दी ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमाकडे जास्त असल्याचे दिसत आहे. या सिनेमाचे सर्व शो हाउसफुल होत आहेत. पण या सिनेमामुळे एका मराठी सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे आता सांगण्यात आले आहे.


आगामी मराठी सिनेमाच्या (Marathi cinema) यादीतील एक सिनेमा म्हणजे ‘चौक ( Chowk Marathi Movie)’ प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड (Kiran Gaikwad Post) यांच्या अनेक महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा सिनेमा १९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. गेल्या आठवड्यात या सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला होता. जो चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. पण आता प्रदर्शनाला सात-आठ दिवस शिल्लक असताना या सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काल अभिनेता किरण गायकवाड यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही पोस्ट शेअर करत या सिनेमाची बदललेली तारीख चाहत्यांना सांगितली आहे. किरणने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की “मायबाप रसिक प्रेक्षकहो, काही तांत्रिक कारणांमुळे आपला चौक हा सिनेमा २ जून रोजी आपल्या भेटीस घेऊन येत आहोत. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच असू द्या.

मोठी बातमी! शाहरुखच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंवर सीबीआयची छापेमारी; गुन्हा दाखल

किरणने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी, हा सिनेमा ‘द केरला स्टोरी’मुळे पुढे ढकलण्यात येत आहे का?” असा सवाल किरणला विचारला आहे. या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्यामुळे चाहते काहीसे दुःखी झाले असल्याचे देखील दिसून येत आहे. हा सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांना आता जून महिन्याची वाट बघावी लागणार आहे.

Exit mobile version