मुंबई पुणे मुंबई 4 येणार का? स्वप्निलच्या उत्तरानं सस्पेन्स वाढला..

सध्या स्वप्नील त्याचा नव्या चित्रपटाची तयार करत असून आगामी काळात अनेक विविध भूमिका साकारणार आहे.

Swapnil Joshi

Swapnil Joshi

Swapnil Joshi : मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा हिरो स्वप्निल जोशी सध्या त्याच्या नव्या प्रोजेक्टसची तयारी करत आहे. मराठी चित्रपटांतील स्वप्निलच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. दुनियादारी आणि मुंबई पुणे मुंबई चित्रपटातील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांची दाद मिळाली. मुंबई पुणे मुंबई चित्रपटाची चर्चा मोठी झाली. मराठी प्रेक्षकांचा या चित्रपटाला मोठा प्रतिसादही मिळाला. या चित्रपटाचा चौथा भाग येणार का अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे. प्रेक्षकांना पडलेल्या हा प्रश्न एकाने थेट स्वप्निललाच विचारला. मग काय, स्वप्नीलनेही थेट काहीच न सांगता सस्पेन्स वाढवणारं उत्तर दिलं.

निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्यातून तो त्याचा नवनवीन प्रोजेक्ट्स बद्दल माहिती देत असतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर त्यांचा फॅन्स सोबत Ask Me Anything सेशन केलं यात प्रेक्षकांनी अनेक प्रश्न विचारले. पण यातल्या एका प्रश्नाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. एका फॅनने स्वप्नीलला मुंबई पुणे मुंबई 4 येणार का ? असा प्रश्न विचारल्यावर स्वप्नीलने उत्तर देताना चक्क चित्रपटाच्या दिग्दर्शकांना म्हणजे सतीश राजवाडे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला यात टॅग करून नेवर से नेवर असं लिहिलं ! आता यातून स्वप्नील नेमकं काय म्हणतोय याचं उत्तर मिळालेलं नाही.

या इंस्टाग्राम स्टोरी नंतर मुंबई पुणे मुंबई 4 नक्की येणार का ? स्वप्नील आणि मुक्ता ची सुपरहिट जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार का? अशा अनेक प्रश्नांना उधाण आलं आहे. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं घर निर्माण केलं आहे यात शंका नाही. सध्या स्वप्नील त्याचा नव्या चित्रपटाची तयार करत असून आगामी काळात अनेक विविध भूमिका साकारणार आहे. 2024 वर्ष त्याने वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्सने गाजवलं आहे आणि आगामी काळात देखील तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

Swapnil Joshi: चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा रॉयल अन् स्टायलीश अंदाज, फोटो व्हायरल

Exit mobile version