Puppet Maker Satyajit Ramdas Padhye : पपेट्सने कोल्डप्लेसोबत (Puppets Rocked with Coldplay) रंगमंच गाजवल्याचं समोर आलंय. एक स्वप्न सत्यात उतरलं. जेव्हा शब्दभ्रमकार आणि बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर टीमने—कौस्तुभ, सुषांत, आणि कैलाश —प्रसिद्ध कोल्डप्ले बँडसोबत (Satyajit Padhye Social Media Post) भारत दौऱ्यात मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स केला.
Union Budget 2025 : अर्थसंकल्पानंतर काय महाग, काय स्वस्त…संपूर्ण यादीच समोर
कोल्डप्लेच्या टीम ने खास सत्यजित आणि त्यांच्या टीमला ह्या शोसाठी (Entertainment News) निवडले. क्रिस मार्टिन आणि त्यांच्या बँडसोबत “गुड फिलिंग्स” या गाण्यावर सत्यजित आणि त्याच्या टीम ने अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला—जेव्हा संगीत आणि पपेट्रीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.
भारतीय भाषांतली पुस्तके अन् तीही डिजीटल; केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत काय खास?
प्रसिद्ध जिम हेनसन कंपनीतील अमेरिकन पपेटियर निकॉलेट आणि ड्रू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणामुळे, सत्यजित आणि त्यांच्या टीमने ५ ऐतिहासिक शोमध्ये आपल्या कलागुणांनी जादू निर्माण केली आणि हा क्षण अविस्मरणीय केला. पपेट्सने कोल्डप्लेसोबत परफॉर्मन्स केल्याचं समोर आलंय.
शब्दभ्रमकार आणि बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये म्हणाला की, या अविस्मरणीय प्रवासाचा भाग बनवल्याबद्दल कोल्डप्लेला मनःपूर्वक धन्यवाद आणि आमच्यावर प्रेम आणि पाठिंबा दर्शवणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे मनःपूर्वक आभार तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं.आम्हाला जगातील सर्वात मोठ्या कोल्डप्ले कॉन्सर्टचा भाग बनविल्याबद्दल धन्यवाद, अशी सोशल मीडिया पोस्ट सत्यजित पाध्ये यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर केलीय.