Pune News : वानवडीत चिमुकल्या मुलींवर अत्याचार; आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी…
Wanavadi Rape Case : पुण्यातील वानवडीमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस चालकाने अत्याचार (Pune Rape Case) केल्याची घटना घडलीयं. या घटनेतील आरोपीला पुणे पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडली असून सरकारी वकील नितीन कोंघे आणि आरोपीच्या वकील सौरभ जायभाये यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर आरोपी संजय रेड्डीला (Sanjay Reddy) पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं. आरोपी येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत असणार आहे.
विधानसभेपूर्वीच वारं फिरलं! अमित शाहंच्या गोटातील खास माणूस पवारांनी फोडला
या घटनेप्रकरणी युक्तिवादात सरकारी वकीलांनी पीडित मुलींचे वैद्यकीय अहवाल सादर करत बाजू मांडलीयं. पीडित मुलीच्या प्रजनन भागाला इन्फेक्शन झालं आहे, त्यामुळे संबंधित आरोपीने अत्याचार केलं असल्याचं उघड होत आहे. अत्याचार कोणत्या ठिकाणी करण्यात आलायं, याचा तपास घ्यायचा आहे, त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, पोलिसांनी अत्याचार कुठे झालायं याचा तपास करावा, असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला आहे. तर प्रत्युत्तरात आरोपीला न्यायालयात आणताना पोलिसांना त्रास झाला. आरोपीच्या जीवाला धोका होऊ शकतो. आरोपीला डायबेटीस आहे, वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी पुरेसा आहे, त्यामुळे कमीत कमी पोलीस कोठडी मिळावी आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात यावी, अशी मागणी आरोपीच्या वकीलांनी केली.
“सावरकर ब्राह्मण होते, गोमांस खात होते”; कर्नाटकच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा
दरम्यान, दोन्ही बाजूच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांनी आरोपी संजय रेड्डी याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून येत्या 8 तारखेपर्यंत त्याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी संजय रेड्डी हा शाळेतील चिमुरडींना बसमधून शाळेत सोडण्याचे व आणण्याचे काम करतो. बसमध्ये दोन्ही चिमुरडी या पुढच्या सीटवर बसत असत. बस चालकाने 6 वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या 4 दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराध्यम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतप्त जमावाने स्कूल बस फोडली…
चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे संतप्त जमावाने शाळेची बस फोडल्याची घटना घडली होती. आरोपीला न्यायालयात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा न्यायालयासमोर तैनात करण्यात आला होता. शाळेची बस फोडल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.