भारतीय भाषांतली पुस्तके अन् तीही डिजीटल; केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत काय खास?
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. काही योजना नव्याने सुरू करणार असल्याचे सांगितले. या बजेटमध्ये सितारामण यांनी भारतीय भाषा पुस्तक योजनेची घोषणा केली. या योजनेची पूर्वतयारी केंद्र सरकारने आधीच सुरू केली होती. आता ही योजना नेमकी काय आहे, कोणत्या भारतीय भाषा पुस्तक स्वरुपात उपलब्ध होणार आहेत, भारतीय भाषांपासून दुरावत चाललेल्यांना यातून काय ज्ञान मिळणार याचा थोडक्यात आढावा घेऊ या…
या अर्थसंकल्पात सरकारने भारतीय भाषा पुस्तक योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत शाळेतील आणि उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना भारतीय भाषांतील पुस्तके डिजीटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक भाषांत अध्ययनासाठी साहित्य उपलब्ध करुन शिक्षण अधिक सोपे करण्याचा उद्देश यामागे आहे अशी माहिती सितारामण यांनी दिली.
बजेटआधी गुडन्यूज! LPG सिलिंडरच्या दरात मोठा बदल; किती रुपयांनी स्वस्त
या योजनेत शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना डिजीटल स्वरुपात पाठ्यपुस्तके आणि शिक्षण संसाधने उपलब्ध होणार आहेत. भाषा विविधतेचा अधिक विस्तार करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या बजेटमध्ये शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आयआयट आणि मेडिकल कॉलेजांतील जागांत वाढ, शिक्षणात एआय तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी कौशल्य विकास यांचाही समावेश आहे.
2024 मध्येच आला होता प्रस्ताव
केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि युजीसी मार्फत जुलै 2024 सुरू करण्यात अस्मिता योजनेत पुढील पाच वर्षांत 22 भारतीय भाषांतील 22 हजार पुस्तके विकसित करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. अस्मिता योजना विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि शिक्षण मंत्रालयांतर्गत भारतीय भाषा समितीत एक संयुक्त उपक्रम आहे. या योजनेत अकादमिक साहित्याचे भाषांतर करणे आणि मौलिक साहित्याचा भारतीय भाषांत प्रचार करणे हाही उद्देश आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळावे. यात कोणतीही अडचण येणार नाही या गोष्टींची विशेष काळजी या योजनेत घेण्यात आली आहे. यामुळे स्थानिक भाषांत शिक्षणाचा एक मजबूत आधार तयार होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
12 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री
याच अर्थसंकल्पात अर्थमंत्री सितारामण मोठी घोषणा करतील. करदात्यांना दिलासा देतील असे वाटत होते. त्यानुसार अर्थमंत्र्यांनी नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला. पुढील आठवड्यात इनकम टॅक्स बिल सादर करण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सितारामण यांनी दिली. या घोषणेनुसार आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. या व्यतिरिक्त करदात्यांना 75 हजार रुपयांच्या मानक वजावटीचा लाभ मिळणार आहे.
करदात्यांना गिफ्ट! 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा