Download App

‘पुष्पा पुष्पा’, ‘द कपल सॉन्ग’ Pushpa 2 : The Rule मधील दोन्ही गाण्यांची नेटकऱ्यांना भूरळ!

Pushpa 2 : The Rule मधील 'पुष्पा पुष्पा' आणि 'द कपल सॉन्ग' या नवीन गाण्यांनी ( Songs ) इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे.

Pushpa 2 : The Rules Songs liked by Netizens : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार रॉकस्टार डीएसपी यांच्या ‘पुष्पा 2: द रुल’ ( Pushpa 2 : The Rule ) मधील ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘द कपल सॉन्ग’ या नवीन गाण्यांनी ( Songs ) इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. अल्लू अर्जुनचा समावेश असलेल्या ‘पुष्पा पुष्पा’ने सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये 100 दशलक्ष व्ह्यूज आणि 2.26 दशलक्ष+ लाईक्सचा टप्पा ओलांडला आहे.

Bunty Bundalbaaz: विद्यार्थ्यांवर आधारित ‘बंटी बंडलबाज’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

तर ‘द कपल सॉन्ग’ने अवघ्या काही दिवसांतच 53M व्ह्यूज आणि 1.16 मिलियन लाईक्स मिळवले आहेत. गाणी रिलीझ झाल्यापासून लाखो लोकांनी याला प्रेम दिलं. अलीकडेच एका जर्मन व्यक्तीने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ‘पुष्पा पुष्पा’ गाण्यावर व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना चिरडले

हि गाणी केवळ व्हायरल होत नाही तर ती अनेकांच्या आवडीची बनली आहेत. अलीकडेच ‘पुष्पा पुष्पा’ने सर्वाधिक वाजलेल्या ५० तेलुगु गाण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘द कपल सॉन्ग’ द्वारे, रॉकस्टार डीएसपीने पुन्हा एकदा आपली अपवादात्मक प्रतिभा आणि जागतिक प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याची क्षमता सिद्ध केली आहे. संगीतकाराच्या चाहत्यांना खात्री आहे की पुरस्कार विजेते संगीतकार ‘पुष्पा 2: द रुल’साठी आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवतील.

DDLJ चं गाणं इंग्रजांच्या प्ले लिस्टमध्ये टॉपला; बीबीसीकडून ‘तुझे देखा तो’ ची निवड

कामाच्या आघाडीवर रॉकस्टार डीएसपीचे हात या वर्षीच्या प्रोजेक्ट्सच्या रोमांचक लाइनअपने भरलेले आहेत. 15 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या ‘पुष्पा 2’ व्यतिरिक्त, त्याच्या संगीतमय उपक्रमांमध्ये सुर्याचा ‘कंगुवा’, अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’, राम चरणचा पुढील शीर्षक नसलेला चित्रपट, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगत सिंग’, धनुषचा ‘कुबेरा’ यांचा समावेश आहे आणि नागा चैतन्यचा ‘थंडेल’ साठी काम करणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज