The Sabarmati Report Release date announce : संपूर्ण भारतातील युवा स्टार राशि खन्ना ( Rashi Khanna ) आणि विक्रांत मॅसी ( Vikrant Messi ) मुख्य भूमिकेत असलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ ( The Sabarmati Report ) आता नव्या दिवशी रिलीज होणार असून याआधी ३ मे रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता २ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. राशी ने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले ” २ ऑगस्ट रोजी ” द साबरमती रिपोर्ट ” च्या फाइल्स पुन्हा उघडणार”
भाजपसोबत जाण्याबद्दल शरद पवारांचा वादळी खुलासा! म्हणाले, माझा ‘तो’ प्लॅन झाला यशश्वी
रंजन चंदेल दिग्दर्शित, ‘द साबरमती रिपोर्ट’ हा एक विचार करायला लावणारा सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. 27 फेब्रुवारी 2002 रोजी राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनांची कथा मांडतो यातून बघायला मिळणार आहे. विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना, दोघेही त्यांच्या आकर्षक कामगिरीसाठी आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखले जाणारे प्रतिभावंत अभिनेते या प्रकल्पात त्यांचा अभिनय दाखवण्यासाठी सज्ज होत आहेत. नवीन रिलीजची तारीख लॉक इन केल्यामुळे चाहते आता विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना यांच्या द साबरमती रिपोर्ट साठी उत्सुक आहेत.
मेहुणा अन् पुतण्याने केला काँग्रेसचा ‘घात’ : निकालापूर्वीच भाजपच्या पहिल्या विजयाची Inside Story
2002 च्या ट्रेन जाळण्याच्या घटनेनंतर काय घडले ते या चित्रपटात उलगडत असताना टीझरच्या व्हिज्युअलमध्ये कमालीची जादू आहे. “देशाला हादरवून सोडणारी घटना. भारतीय इतिहास कायमचा बदलून टाकणारी घटना घडली.” रंजन चंदेल दिग्दर्शित हा चित्रपट 2 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’ गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनांची कथा असणार आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित या चित्रपटात राशी पूर्णपणे नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ” योद्धा ” मधून तिने उत्तम अभिनय केला आहे.