भाजपसोबत जाण्याबद्दल शरद पवारांचा वादळी खुलासा! म्हणाले, माझा ‘तो’ प्लॅन झाला यशस्वी
Sharad Pawar : राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला या मुद्यावरून गेली 2014 पासून दोन्ही बाजूने दाव्या प्रतिदाव्यांसह वेगवेगळी स्पष्टीकरणं दिली जात आहे. त्यामध्ये 2019 चा पाहाटेचा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधीही मोठ्या प्रमाणात गाजला. आता शरद पवारांनी (Shivsena Bjp) यामध्ये मोठा दावा केला आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी पाठिंब्याची चर्चा पुन्हा एका चर्चेला आली आहे. (Ajit Pawar) मला शिवसेनेसोबत जायच होत तर सहकाऱ्यांना भाजपसोबत जायचं होत. त्यामध्ये माझा प्लॅन यशश्वी झाला, असा मोठा खुलासा शरद पवारांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाख देताना त्यांनी हा खुलासा केला आहे.
आम्हाला शिवसेनेला भाजपपासून दूर करायचं होत
या विषयावर बोलताना पवार म्हणाले, 2014 साली आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, पाठिंबा दिला नाही. कारण ती एक राजकीय गुगली होती असं पवार म्हणाले. तसंच, आम्हाला शिवसेनेला भाजपपासून दूर करायचं होत हा आमचा 2017 चा खरा प्लॅन होता. तो प्लॅन यशश्वी झाला असंही पवार म्हणाले आहेत. तसंच, लोकशाहीमध्ये सर्वांनाच सत्तेत जाता येत नाही. 2014 ला अजित पवार विरोधात होतेच ना? असा प्रतिप्रश्नही पवारांनी उपस्थित केला आहे.
मी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही
आज मी आणि उद्धव ठाकरे जसे एकत्रित भूमिका मांडतो ते मला हवं होत. यासाठीच हा पाठिंब्याचा प्लॅन केला होता. खर तर यामध्ये कुठेच भाजपसोबत जायचा विचार नव्हता. मात्र, माझ्या सहकाऱ्यांचा तो निर्णय होता. मात्र, त्या विषयात मी कुठल्याही निर्णयापर्यंत पोहचलो नाही. कारण पक्षाचा प्रमुख म्हणून माझा काही वैयक्तिक निर्णय आहेत की नाही? असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. तसंच, जेव्हा प्रत्यक्षात निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही असं स्पष्टीकरणही पवारांनी यावेळी दिलं.
अजित पवारांची भूमिका मला आवडली नव्हती
यावेळी पवारांनी अजित पवारांच्या भूमिकेवर आणि टीकेवर उत्तर दिली आहेत. अजित पवारांनी आपल्यावर काही आरोप केले आहेत असं विचारलं असता, पवार म्हणाले तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधिल नाही. त्याचबरोबर पवारांनी पहाटेच्या शपथविधीवरही भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीला माझा पाठिंबा होता म्हणतात मग तीन दिवसांनी त्यांनी राजीनामा का दिला? त्यावेळीची अजित पवारांची भूमिका मला आवडली नव्हती असंही पवार यावेळी म्हणाले आहेत. तसंच, अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपसोबत जायचं नव्हत पण सत्तेत जायचं होतं असा खुलासाही पवारांनी केला आहे.