Raghubir Yadav had suffered a heart attack : ‘हुंकार: द रोअर’ या मालिकेला तिची उत्कंठावर्धक कथा, प्रभावी मांडणी आणि कलाकारांच्या दमदार अभिनयासाठी सर्वत्र कौतुक मिळत आहे. या मालिकेच्या केंद्रस्थानी आहेत अभिनेते रघुबीर यादव, ज्यांनी बापजी ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेत रघुबीर यादव पहिल्यांदाच एका वेगळ्या नकारात्मक भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने, बारकाव्यांनी समृद्ध अभिनयाने आणि दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मालिकेतील एका खास दृश्याच्या विश्लेषणादरम्यान दिग्दर्शक करण कपाडिया आणि रघुबीर यादव यांनी प्रेक्षकांना मालिकेच्या पडद्यामागील गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांनी मालिकेतील महत्त्वाच्या दृश्यांमागील सर्जनशील प्रक्रिया आणि चित्रीकरणादरम्यान घडलेले काही अविस्मरणीय किस्सेही शेअर केले.
या संवादादरम्यान करण कपाडिया यांनी एक धक्कादायक खुलासा केला. मालिकेतील एका महत्त्वाच्या साक्षीच्या दृश्याचे चित्रीकरण सुरू असताना, त्याच्या आदल्या रात्री रघुबीर यादव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. या प्रसंगाची आठवण सांगताना रघुबीर यादव यांनी आपल्या खास विनोदी शैलीत मिश्कील टिप्पणी केली. ते म्हणाले की, हे दृश्य इतके थरारक होते की त्यापेक्षा हृदयविकाराचा झटका आलेला बरा वाटला! या किस्स्यातून या दृश्याच्या चित्रीकरणातील आव्हाने आणि कॅमेऱ्यामागे घडणाऱ्या अनपेक्षित घटनांची झलक पाहायला मिळते.
महायुतीत वादाची ठिणगी! नवनाथ बनांवर निलेश राणे आक्रमक, शिंदेंनी दिले नेत्यांना महत्त्वाचे आदेश
हुंकार’मधील रघुबीर यादव यांच्या संस्मरणीय दृश्यांचे विश्लेषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
https://www.instagram.com/reel/DfE7M_mAnBr/?exln=d3FuMXJsMjE3Zzd6
‘हुंकार: द रोअर’ या मालिकेची निर्मिती बिर्ला स्टुडिओज आणि अप्लॉज एंटरटेनमेंट यांनी पर्पल पेबल पिक्चर्सच्या सहकार्याने केली आहे. ही मंगाता फिल्म्सची निर्मिती आहे. करण डी. कपाडिया आणि नित्या मेहरा यांनी या मालिकेची संकल्पना मांडली असून, प्रियंका चोप्रा जोनस या कार्यकारी निर्मात्या आहेत.
अजूनही ‘हुंकार: द रोअर’ ही मालिका पाहिली नाही?
रघुबीर यादव यांचा बापजी या आजवर कधीही न पाहिलेल्या दमदार नकारात्मक भूमिकेतील अभिनय पाहण्यासाठी ही थरारक मालिका आता जिओहॉटस्टारवर उपलब्ध आहे.
