Download App

अखेर राहुल सोलापूरकरला उपरती ! भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा

Rahul Solapurkar छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्यानंतर चर्चेत भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा

Rahul Solapurkar resigned Bhandarkar Oriental Institute Trustee : मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्यानंतर चर्चेत आहेत. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत. टीकेची झोड उठली आहे. ते ज्या ज्या संस्थांवर आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी केली जात होती.

माझी आई वडिलांचा बदला घेतेय, तिला आर्थिक विवंचना नाहीत; करुणा शर्मांच्या मुलाचाच दावा

त्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांनी संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये सुमारे तासभर बैठक झाली. संस्थेच्या नियमक मंडळाचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर देखील बैठकीत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे राहुल सोलापूरकर केलेलं वक्तव्य तसेच भूमिकेशी भांडारकर संस्थेचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं.

काय आहे वाद?

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर चौफेर बाजूंनी टीका झाली. राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर वाद वाढला. त्यांच्यावर जोरदार टीका झाली. घराबाहेर आंदोलने झाली. राहुल सोलापूरकर यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली.

यावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील संताप व्यक्त केला. राहुल सोलापूरकरवर बोलताना उदयनराजे म्हणाले की, राहुल सोलापूरकर कोण आहे? त्याने असं शिवभक्तांच्या भावना दुखावणारे विधान का केलं? तसेच जे लोक लाच घेतात. त्यांना त्यापलीकडे काही दिसत नाही. जिभेला हाड नसतं तसेच काही लोक उचलले जीभ लावली टाळ्याला असं बोलतो. अशा लोकांचं जिभा हासाडायला पाहिजे. तसेच महापुरुषांबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या लोकांना जनतेने दिसेल तिथे ठेचून काढला पाहिजे. कारण अशी विकृती वाढली.

follow us