राहुल सोलापूरकर सारख्यांच्या जिभा हासाडायला पाहिजे; उदयनराजे भोसले संतापले
Udayan Raje Bhosale on Rahul Solapurkar : मागील काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) हे चर्चेत आहेत. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झालाये. राहुल सोलापूरकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका-टिप्पणी केली जातेय. त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी विधानामागची नेमकी भूमिका स्पष्ट करत माफी मागितली होती. यावर आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.
राहुल सोलापूरकरवर बोलताना उदयनराजे म्हणाले की, राहुल सोलापूरकर कोण आहे? त्याने असं शिवभक्तांच्या भावना दुखावणारे विधान का केलं? तसेच जे लोक लाच घेतात. त्यांना त्यापलीकडे काही दिसत नाही. जिभेला हाड नसतं तसेच काही लोक उचलले जीभ लावली टाळ्याला असं बोलतो. अशा लोकांचं जिभा हासाडायला पाहिजे. तसेच महापुरुषांबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या लोकांना जनतेने दिसेल तिथे ठेचून काढला पाहिजे. कारण अशी विकृती वाढली.
मी आण्णा म्हणते पण तुम्ही मला ताई म्हणत नाही; बीडमध्ये पंकजांची धसांबाबत खंत
तर देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो. त्या लोकांमुळे जातीधर्मांमध्ये तेढ निर्माण होते. तसेच मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांना भेटून अशा लोकांवरती देशद्रोहाची कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तसेच या लोकांना चित्रपटसृष्टीतही थारा दिला जाऊ नये. मी अशा वक्तव्यांचा निषेध करतो. मला तर या आणि अशा प्रकारे विधानं करणाऱ्या लोकांना गोळ्या घालून मारलं पाहिजे. असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.
काय आहे प्रकरण?
ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर समाजातील चौफेर बाजूंनी टीका झाली. त्याचं झालं असं की, राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका औरंगजेबाच्या लोकांना लाच देऊन करून घेतल्याचा दावा सोलापूरकरांनी केला होता. अखेर यावरून अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितलीय.