मी आण्णा म्हणते पण तुम्ही मला ताई म्हणत नाही; बीडमध्ये पंकजांची धसांबाबत खंत
Pankaja Munde On Suresh Dhas in The Inauguration Of The Khuntephal Irrigation Project: आज बुधवार 5 फेब्रुवारी बीड जिल्ह्यातील भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मतदार संघामध्ये आष्टी जवळील खुंटेफळ येथे सिंचन प्रकल्पाचा उद्घाटन पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी गेल्यात कित्येक दिवसांपासून कट्टर विरोधक झालेल्या भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे एकाच मंचावर आले होते त्याचबरोबर यावेळी कार्यक्रम स्थळी देखील एकाच गाडीतून पोहोचल्याच पाहायला मिळालं.
दरम्यान यावेळी भाषणामध्ये बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, सुरेश धस जसे तुम्ही चित्रपटांचे डायलॉग म्हणता. तसे आम्ही देखील म्हणते की, मेरा वचन हे मेरा शासन है. त्यामुळे मी सुरेश धस यांना जाहीर रित्या जे वचन दिले. तेच माझं शासनाने मी गोपीनाथ मुंडे यांचे लेक आहे. बोलने एक अन् करने एक माझ्या रक्तात नाही. सुरेश धस मी पण तुम्हाला आण्णा म्हणते पण तुम्ही मला ताई म्हणत नाही. आपलं प्रेमाचं नातं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला इज्जत देतो.
Video: मी बोललो की बीडची बदनामी होते; सीएम फडणवीसांच्या समोरच धसांचा बीडच्या नेत्यांना टोला
तसेच आजच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे येणार अशी चर्चा होती. पण मी का येणार नाही. सुरेश धस यांनी मोठ्या मुलाच्या लग्नात साडी आणि पत्रिका घेऊन मला आमंत्रण दिलं होतं. मी आले होते. आता लहान मुलाच्या लग्नातही मला बोलावलं तर मी नक्की येईल. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे शासन देवेंद्र फडणवीस यांचा आहे त्यात मी मंत्री आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री आहेत त्यामुळे मी आले. तसेच या कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव नसतं. बसायला जागा नसती तरी मी आले असते. मीही मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे. त्यामुळे मी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आले.
सरकारने बेशरमीची भूमिका घेतलीय; मस्साजोग हत्येप्रकरणी वडेट्टीवारांचा घणाघात
तसेच यावेळी त्यांनी फडणवीसांबद्दल देखील भरभरून बोलल्या त्या म्हणाल्या की, बीडची जनता देवेंद्र फडणवीसांना बाहुबली म्हणते मात्र काही दिवसांपूर्वी ते मला शिवगामीनी म्हणत होते. कारण शिवगामीनी बाहुबलीची आई आहे. त्यामुळे तुम्ही जरी माझ्यापेक्षा मोठे असाल तरी आज तुमच्या बद्दल ममत्वभाव येतोय.