Video: मी बोललो की बीडची बदनामी होते; सीएम फडणवीसांच्या समोरच धसांचा बीडच्या नेत्यांना टोला

  • Written By: Published:
Video: मी बोललो की बीडची बदनामी होते; सीएम फडणवीसांच्या समोरच धसांचा बीडच्या नेत्यांना टोला

Suresh Dhas Khuntephal Storage Pond Project : गेल्या काही महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणावरून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. (Suresh Dhas ) त्यानंतर आज सुरेश धस यांनी पुन्हा जाहीर कार्यक्रमातून अप्रत्यक्षरित्या संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केलं. ‘मी बोललो की बीडची बदनामी होते असा आरोप होतो, असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षरित्या बीडमधील राजकीय नेत्यांवर भाष्य केलं. आष्टी मतदारसंघातील खुंटेफल साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

आज मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफल साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण केले. या खुंटेफळ तलावामुळे ३० गावांमधील तब्बल ८० हजार एकर ओलिताखाली येणार आहे. २८०० कोटी रुपयांच्या महत्वकांक्षी प्रकल्पातून स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणीही धस यांनी भाष्य केलं. साहेब आपण संतोष देशमुख खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली. तुम्ही म्हणाले होते ना..मी कुणालाच सोडणार नाही, त्यावर सर्व जनतेचा विश्वास आहे. मुख्यमंत्री साहेब अजून वाळू, राख, भूमाफिया यांनासुद्धा मोक्का लागला पाहिजे, अशी आमची विनंती आहे. तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे, असंही म्हणत सुरेश धस म्हणाले.

साहेब मला चांगलं आठवतंय, 2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊनसुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत. जनादेश तुमच्या बाजूनं होता पण पहाटेच आमचा जनादेश चोरून नेला. तेव्हा ज्याप्रकारणे आपल्यावर राजकीय आणि कौंटुबिक जीवनातून उध्वस्त करण्याची कट कारस्थानं रचली गेली, परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला, त्याला तोडच नाही. त्यावर मात केली आपण. त्याला बिनजोड पैलवान म्हणतात, तो बिनजोड पैलवान आहेत तुम्ही..असं म्हणत धस यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube