मी केज अन् आष्टी मतदारसंघात…पंकजा मुंडे सुरेश धस यांना आव्हान देणार? मतदारसंघाबाबत मोठ वक्तव्य

मला हरवण्यासाठी बीड मधील मोठे नेते प्रयत्न करत होते. भाजपचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचारही पंकजा मुंडे यांनी केला होता.

  • Written By: Published:
News Photo   2025 10 29T185837.192

बीड जिल्ह्याच्या राजकारणात काही दिवासांपासून भाजप आमदार सुरेश धस आणि भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्यात चांगलाच संघर्ष सुरू आहे. नुकतच आपण केज आणि आष्टी या दोन्ही मतदारसंघात अधिक लक्ष देणाार असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. (Beed) त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय अर्थ काढले जात असून त्यांचे हे विधान आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या राजकीय प्रभावाला अनुसरून असल्याने त्यांची जास्त चर्चा आहे. त्याचबरोबर प्रीतम मुंडेही जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

एका स्नेहमिलन कार्यक्रमात बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘मी केज आणि आष्टी मतदारसंघात तर प्रीतम मुंडे या माजलगाव आणि गेवराई मतदारसंघात जास्त लक्ष घालणार असल्याचे सांगितलं. त्यामुळं आष्टी मतदारसंघात अधिक लक्ष देणार या वक्तव्याला सुरेश धस यांच्याशी जोडून पाहिले जात आहे. आमदार सुरेश धस यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना उमेदवार म्हणून उभे केले असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर आता ही चर्चा होत आहे.

या प्रकरणात त्यांनी स्वत:ची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करू नये; धसांचा मुंडेंना टोला

मला हरवण्यासाठी बीड मधील मोठे नेते प्रयत्न करत होते. भाजपचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचारही पंकजा मुंडे यांनी केला होता. या राजकीय पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे याचं वक्तव्य अधिक गंभीरपणे राजकीय गोटात चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. तसंच, त्यावेळी जरांगे फॅक्टरही मोठा प्रभावी असल्याचा फटका त्यांना बसला. केज मतदार संघातून ओबीसी बहुलगावातील मतदानही पंकजा मुंडे यांना मिळाले नव्हते. बजरंग सोनवणे यांनीही पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती.

काही दिवसांपूर्वी बीड-अहिल्यानगर रेल्वे उद्घाटनाच्या कार्यक्रमातील भाषणात मंत्री पंकजा मुंडे यांनी भाषणात बजरंग सोनवणे यांचं कौतुक केल्याचं दिसून आलं होतं. परंतु, आता लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच मी केज मतदार संघात लक्ष घालणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटल्याने भुवया उंचावल्या आहेत. दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाता पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत.

follow us