माझी आई वडिलांचा बदला घेतेय, तिला आर्थिक विवंचना नाहीत; करुणा शर्मांच्या मुलाचाच मोठा दावा
Seeshiv Munde : कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने (Family Court in Bandra मंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) करूणा शर्मांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले. मात्र, कोर्टाचा हा निकाल करुणा शर्मांना मान्य नाही. मला पोटगी म्हणून १५ लाख रुपये हवे, यासाठी आपण हायकोर्टात (Mumbai High Court) जाणार अससल्याची भूमिका करूणा शर्मांनी घेतली. यावर आता सीशिव धनंजय मुंडे (Seeshiv Munde)याने भाष्य केलं.
Air Force Fighter Plane Crashes : मोठी बातमी! मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले
माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत, तरी सुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही, असे जाणीवपूर्वक ठरवलं, असा आरोप सीशिव याने केला.
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा १८ वर्षांचा मुलगा सीशिव धनंजय मुंडे याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. त्यात त्याने लिहिलं की, मी शीशिव धनंजय मुंडे. मला आता बोलणे भाग आहे. कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे. माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानीकारक नव्हता. माझी आई कायम तिच्या अनेक कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची, असं शीशीव म्हणाल्या.
आईकडूनच आमच्यावर हिंसाचार
पुढं त्याने लिहिलं की, जो घरेलू हिंसाचार तिच्यासोबत झाला, असा ती दावा करते. तो घरेलु हिंसाचार खरंतर मी, माझी बहीण आणि माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा.
माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला आणि माझ्या बहिणीलासुद्धा घर सोडून जायला सांगितले. कारण तिच्या मते तिचा आणि आमचा (जन्मदाती आई असूनही) काहीही संबंध राहिला नव्हता, असं सीशिव म्हणाला.
2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत. तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही, असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या-नाट्या गोष्टी पसरवत असते, असा आरोप देखील सीशिव याने केला.