Download App

Jailer Collection: थलायवाच्या ‘जेलर’चा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! कमावले तब्बल ‘इतके’ कोटी…

Jailer Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा म्हणजेच रजनीकांतचा (Rajinikanth) मोठा चाहतावर्ग आहे. आज देखील चाहत्यांमध्ये त्याच्या सिनेमांची क्रेझ कायम पाहायला मिळत असते. सध्या त्याचा ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनच्या २ दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला आहे.

‘जेलर’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘जेलर’ या सिनेमाने प्रदर्शनच्या पहिल्या दिवशी ४८ कोटींचा गल्ला कमावला आहे. तर दुसऱ्या दिवशी २७ कोटींची मोठी कमाई केली आहे. तसेच प्रदर्शनच्या २ दिवसांत या सिनेमाने ७५.३५ कोटींचा मोठा गल्ला जमवला आहे. हा सिनेमा वीकेंडला मोठी कमाई शक्यता आहे. यामुळे लवकरच हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा पार करणार असल्याचे दिसत आहे.

२०० कोटींच्या बजेटमध्ये ‘जेलर’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमामध्ये थलायवासह शिव राजकुमार, मिर्ना मेनन, तमन्ना भाटिया, मोहनलाल आणि वसंत रवी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहे. या सिनेमामधील गाणी चाहत्यांच्या चांगलच पसंतीस उतरली आहेत. प्रदर्शनच्या २ दिवसांत या सिनेमाने कमाईच्या एक अनोखा विक्रम आपल्या नावे केल्याचे पाहायला मिळत आहे.

दक्षिणेकडे थलायवाला देवाचा दर्जा देण्यात येत असल्याचे आपण पाहिलं आहे. यामुळे प्रदर्शनच्या पहिल्या दिवसापासूनच त्याच्या सिनेमाला चाहते तुफान गर्दी करत असल्याचे बघायला मिळत आहे. थलायवाचा जेलर हा सिनेमा १० ऑगस्ट २०२३ दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. तब्बल २ वर्षांनी थलायवाने या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. ‘जेलर’ या सिनेमात थलायवाने मुथुवेल पांडियनची भूमिका साकारली आहे.

‘जेलर’ सिनेमाच्या प्रदर्शनच्या दिवशी दक्षिणेकडील बंगळूरू आणि चेन्नईसह अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच एक जपानी जोडपे जपानवरुन खास चेन्नईला थलायवाचा सिनेमा पाहायला आले होते. देशभरातील बॉक्स ऑफिसवर सध्या थलायवाच्या ‘जेलर’चा बोलबाला होत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे.

OMG 2 Gadar 2 Release : ‘ओएमजी 2’ च्या पोस्टरवर दूध, सनीच्या ‘मैं निकला गड्डी लेके…’ वर डान्स; प्रेक्षकांचा धुमाकूळ

Tags

follow us