Download App

Rajkummar Rao: प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर अभिनेत्याने सोडलं मौन

Rajkummar Rao on Plastic Surgery: चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री अनेकदा कॅमेरात चांगले दिसण्यासाठी अनेक प्रकारची शस्त्रक्रिया करताना दिसत असतात. बऱ्याच सेलिब्रिटींनी हे केले आहे आणि अभिनेता राजकुमार रावचे (Rajkummar Rao) नवीनतम फोटो पाहून अनेकांनी असेच म्हटले आहे. अनेक दिवसांपासून त्यांचा एक फोटो व्हायरल होत होता. ज्यामध्ये त्यांची वेगळी स्टाइल दिसत होती. (Plastic Surgery) सोशल मीडियावर (social media) लोक राजकुमार रावबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते पण आता अभिनेत्याने त्याला थेट सुनावले.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या ‘श्रीकांत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान इंडिया टुडेशी बोलताना तो प्लास्टिक सर्जरीच्या अफवेवरही मोकळेपणाने बोलला, ज्यात त्याने आपल्या बदललेल्या स्टाइलवर उघडपणे भाष्य करताना दिसला आहे.

प्लास्टिक सर्जरीच्या अफवेवर राजकुमार राव काय म्हणाले?

‘सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या हनुवटीवर प्लास्टिक सर्जरी केल्याचे बोलले जात आहे. या अफवेबाबत नेमकं काय सत्य आहे ?’ यावर राजकुमार राव यांनी थेट प्रतिक्रिया दिली. म्हणाला की, ‘जेव्हा मी तो फोटो पाहिला तेव्हा मलाही आश्चर्य वाटले की तो मीच आहे, मी विचारही केला नाही. हे खरे आहे की 8-9 वर्षांपूर्वी मी एक लहान फिलर घातला होता.

Sonu Sood: सोनू सूदला मिळाला एक नवा जिम पार्टनर; म्हणाला, ‘प्यारे मोहन…’

राजकुमार पुढे म्हणाला की, ‘मला सांगण्यात आले होते की यामुळे माझा चेहरा संतुलित होईल. मी कोणतीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. मी स्वतःला चांगले दिसण्यासाठी फिलर्स देखील केले आहेत. त्यानंतरच मी अनेक चित्रपट केले आहेत आणि जर तुम्ही स्वतःला चांगले दिसण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करू शकत असाल तर का नाही पण तुम्ही असे काहीही करू नये. ज्यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा वेगळे दिसणार आहात.

‘श्रीकांत’ कधी रिलीज होणार?

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित श्रीकांत हा चित्रपट एक बायोपिक आहे. यामध्ये राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जो श्रीकांत बोल्लाची भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रीकांत हा एक अंध व्यक्ती असून तो व्यावसायिक असून त्याच्या संघर्षाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. श्रीकांत हा चित्रपट 10 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. ज्योतिका, आलया एफ आणि शरद केळकर हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज