Download App

Jeena Sikha De: अरिजितच्या जादुई आवाजात सजलंय ‘जीना सिख दे’! ‘श्रीकांत’ मधील गाणं ऐकाच

Shrikanth Movie: बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित सिनेमा एका दृष्टिहीन मुलाची कथा असल्याचं सांगितले जात आहे.

Jeena Sikha De Song Release: आपल्या अष्टपैलू अभिनयाने सिनेरसिकांना वेड लावणारा अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) पुन्हा एकदा आपला पॉवरपॅक परफॉर्मन्ससह मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला. राजकुमार रावच्या आगामी ‘श्रीकांत’ (Srikanth Movie) या चित्रपटातील नवीन गाणं लाँच करण्यात आला आहे. या सिनेमात शरद केळकर (Sharad Kelkar) आणि भरत जाधव (Bharat Jadhav) हे महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. उद्योजक श्रीकांत बोला यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे.

आता सिनेमाची रिलीज जवळ येत आहे, तसतसे निर्मात्यांनी अरिजितने गायलेले चित्रपटातील बहुप्रतिक्षित ‘जीना सिख दे’ हे गाणे रिलीज केले आहे. सिंग यांनी आवाज दिला आहे. अरिजित सिंग यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे वेद शर्मा यांनी संगीतबद्ध केले असून कुणाल वर्मा यांनी लिहिले आहे. हा हृदयस्पर्शी ट्रॅक राजकुमार रावचे पात्र श्रीकांत आणि अलाया एफचे पात्र स्वाती यांच्यातील निःस्वार्थ प्रेम सुंदरपणे टिपलेला आहे.

बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा एका दृष्टिहीन मुलाची कथा असल्याचं सांगितले जात आहे. जन्मत: अंधत्व असलेला श्रीकांत हा मोठी स्वप्ने पाहतो. इतर सामान्य मुलांच्या तुलनेत श्रीकांत अभ्यासासह इतर गोष्टींमध्येही खूप हुशार असतो. श्रीकांतची स्वप्ने खूप मोठी आहेत. मात्र, त्याच्या या मार्गात शिक्षण व्यवस्था, समाजाचा अंध व्यक्तींविषयी असलेला दृष्टीकोन असे अनेक अडथळे या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. या अडथळ्यांना श्रीकांत कसा दूर करतो, त्याला कोणाची साथ मिळते, स्वप्न पूर्ण करताना कशी मेहनत घेतो अशा अनेक गोष्टींचे चित्रण या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Hastay Na Hasaylach Pahije: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या पडद्यामागची धमाल पाहिलंत का?

कधी रिलीज होणार ‘श्रीकांत’

या सिनेमात अभिनेत्री ज्योतिकाची देखील मुख्य भूमिकेत आहे. शिवाय मराठमोळा अभिनेता शरद केळकर देखील खास भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. तर टी-सीरिजचे भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी यांनी दिग्दर्शन केले आहे. 10 मे दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

follow us