Rakhi Sawant Birthday: बॉलिवूडची ड्रामा क्वीन (Drama queen) म्हणून ओळख असणारी सोशल मीडियावर (Social media) सतत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. दररोज राखीचा (Rakhi Sawant) काही तरी नवा ड्रामा चाहत्यांना बघायला मिळत असतो. तिचा हा ड्रामा मात्र, चाहत्यांना खूप आवडतो. आज 25 नोव्हेंबर रोजी राखीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने काही खास गोष्टी तिच्याबद्दल जाणून घेऊया…
25 नोव्हेंबर 1978 रोजी मुंबईत राखीचा जन्म झाला. आज जरी बॉलिवूडमध्ये राखी सावंतच्या नावाची चर्चा असली, तरी एक काळ असा होता की दोन वेळच्या अन्नासाठी तिला पडेल ते काम केल्याचे सांगितले जाते. कायम काहीना काही कारणाने जोरदार चर्चेत राहणाऱ्या राखी सावंत हिचा हा प्रवास अतिशय संघर्षमय होता. संपूर्ण जग जरी तिला राखी सावंत या नावाने ओळखत असले, तरी हे तिचे नेमकं खरं नाव कोणालाच माहिती नाही.
आता अनेकांना प्रश्न पडला असेल की,अभिनेत्रीचं नेमकं नाव काय आहे? तर राखी सावंत हिचे खरे नाव नीरु भेडा होते. राखीच्या जन्माच्या वेळी तिची आई एका हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करत होती. राखी लहान असताना तिला व्यवस्थित अन्न देखील भेटलं नाही. अक्षरशः लोकांनी फेकून दिलेल्या अन्नावर त्या आपल्या पोटाची भूक भागवली आहे. दरम्यान, राखीच्या आईने दुसरं लग्न केलं. यानंतर जुने दिवस आयुष्यातून आणि मनातून पुसले जावे म्हणून राखीने देखील वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली होती. अशाप्रकारे नीरु भेडा हिचं नाव बदलून राखी सावंत करण्यात आल्याची माहिती समोर आली.
राखी सावंत हे बॉलिवूड मध्ये स्वतः अनोखं स्थान निर्माण केले आहे तरी, राखीच्या आयुष्यात अशी एक वेळ आली होती, ज्यावेळी एक दिवसाचे जेवण मिळवता यावे, म्हणून तिने अंबानींच्या घरातील एक लग्नात वाढपी म्हणून देखील काम केल्याचे बघायला मिळाले होते. या कामासाठी राखीला एका दिवसाचे फक्त 50 रुपये देण्यात आले होते. परंतु, या पैशातून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरेल या आशेने राखी पडेल ते काम करायला कायम तयार होती. तिच्या मनात अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. अखेर जवळचे सगळे पैसे जमवून राखीने मनोरंजन विश्वात पाऊल टाकले.
हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावातच’ या नव्या रिअॅलिटी शोचं ‘गावरान वेलकम’ गाणं रिलीज! एकदा पाहाच….
सुरुवातीच्या काळात राखीला अनेक दुय्यम दर्जाच्या सिनेमात काम करावे लागले आहे. या दरम्यान राखीला कास्टिंग काऊचचा सामना देखील करावा लागला होता. काही काळाने तिने प्लास्टिक सर्जरी करून घेतली आणि स्वतःचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. यानंतर तिने काही आयटम साँग्समध्ये देखील हटक्या अंदाजात काम केले आहे. यामुळे ती कायम चर्चेत राहिली आहे.