हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावातच’ या नव्या रिअ‍ॅलिटी शोचं ‘गावरान वेलकम’ गाणं रिलीज! एकदा पाहाच….

हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावातच’ या नव्या रिअ‍ॅलिटी शोचं ‘गावरान वेलकम’ गाणं रिलीज! एकदा पाहाच….

Jau Bai Gaavat Song Release : ‘झी मराठीच्या जाऊ बाई गावात’ (Jau Bai Gaavat) या नव्या रिअ‍ॅलिटी शो ने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते स्पर्धकांचे नव नवे प्रोमो ह्या सर्वांमुळे चाहत्यांमध्ये ही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कधी ना पहिला असा एक रिअ‍ॅलिटी शो त्यांच्या भेटीला येणार आहे, ज्याची ते खूप दिवसापासून वाट पाहत असतानाच ‘जाऊ बाई गावातच’ शीर्षक गीताचं धमाकेदार टीझर झी मराठीने आपल्या सोशल मीडियावर (Social media) रिलीज केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


हार्दिक जोशीचा (Hardik Joshi ) गावराण अंदाज ह्या टिझरमध्ये बघायला मिळत आहे. फक्त गाण्याच्या टीझरने इतका गोंधळ उडाला आहे, तर काय होईल जेव्हा पूर्ण गाण्याचा व्हिडिओ चाहत्यांच्या समोर येईल. आता वाजणार अन गाजणार !! चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा नवीन रिअ‍ॅलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ आपल्या भेटीला लवकरच येणार आहे. 4 डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त मराठीवर.

‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या रिअ‍ॅलिटी शोचा आज आणखी एक चाहत्यांचा उत्सुकता वाढवणारा धमाकेदार प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘हार्दिक जोशीने’ अजून दोन नवीन स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. या शोची पाचवी स्पर्धक आहे सुरेल संस्कारी ‘श्रेजा म्हात्रे’, मॉडेल आणि सोशल मीडियाची आहे ती राणी लिहू शकनार का? ती गावात स्वतःची एक अनोखी कहाणी?

सहावी स्पर्धक ‘मोनिशा आजगावकर’, फोटोग्राफी आणि सामाजिक कार्याची आहे हिला आवड. आपल्या कॅमेरामध्ये दुनियेला जी करते कैद करत असते. शहरातल्या सवयी गावात कश्या टिकणार? तर पहिले चार स्पर्धक आहेत. श्रीमंत घरची नात जिला घाबरतात सर्व घरात नाव आहे. तिचे ‘स्नेहा भोसले’ जी आहे लेडी डॉन, तिच्या किक बॉक्सिंगचा सगळीकडे बोलबाला आहे.

Jau Bai Gavat: करणार तेव्हा कळणार! ‘जाऊ बाई गावात’ 6 स्पर्धकांची नाव जाहीर

दुसरी स्पर्धक आहे पापा की परी ‘संस्कृती साळुंखे’ जिचा चॉईसच आहे महाग, क्लिनिकल सायकॉलॉजिच्या डिग्रीचा तिला आहे अभिमान, तिच्या समोर कोणी काहीही लपवू शकत नाही. तिसरी स्पर्धक आहे फॅशन दिवा ‘रसिका ढोबळे’ जिच्या फॅशन फिगरवर आहेत सर्व फिदा. चौथी स्पर्धक आहे प्लस साइझ मॉडेल ‘हेतल पाखरे’ जिचं व्यक्तिमत्व आहे वजनदार. स्वताच्याच प्रेमात असलेल्या ह्या मुली गावाला त्यांच्या प्रेमात पडू शकणार का? ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi) या नव्या कार्यक्रमात झळकणार आहे.

‘आता करणार तेव्हा कळणार’. हळू हळू तुमच्यासमोर उलगडतील आणखी एका पेक्षा एक व्यक्तिमत्वाचे स्पर्धक. चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा नवीन रिअ‍ॅलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ आपल्या भेटीला येणार आहे. 4 डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त मराठीवर बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube