Rakul Jackky Wedding : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ( Rakul Jackky Wedding ) यांनी काल (21 फेब्रुवारीला) गोव्यामध्ये लग्न गाठ बांधली. यावेळी ते दोन वेळा विवाह बंधनात अडकले. अगोदर त्यांचा शीख पद्धतीने विवाह झाला. त्यानंतर सिंधी परंपरेनुसार त्यांनी विवाह केला. यावेळी या दोघांचेही पोशाख खास डिझायनरकडून डिझाईन करून घेण्यात आलेला होता.
Sanjay Raut : नड्डांचा सल्ला 25 लाखांचा पेन 15 लाखांचा सूट वापरणाऱ्या मोदींना लागू; राऊतांचा टोला
रकुल प्रीतने परिधान केलेला पेस्टल लेहेंगा डिझायनर तरुण तहिलियानी यांनी डिझाईन केलेला होता. यामध्ये पूर्ण हॅन्डवर्क करण्यात आलं होतं. डिझायनर तहिलियानी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, या लेहंग्यावरती हस्तिदंत आणि आयवरी रंगांमध्ये थ्री डायमेन्शनल फ्लोरल मोटिक्स आणि हॅन्डवर्क केलेला मॉडर्न एलूर दाखवण्यात आला आहे.
मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी CBI ची धाड
तर जॅकी भगनानीने परिधान केलेल्या शेरवानीबद्दल सांगायचं झालं. तर यावरती चिकनकारी हे काम करण्यात आलेलं होतं. ही शेरवानी देखील डिझायनर तरुण तहिलियानी यांनीच बनवली होती. याबद्दल सांगताना तरुण म्हणाले की, या शेरवानीवर कश्मीरचं सौंदर्य, कल्चर आणि क्रिएटिव्हिटी याशिवाय चिनार पत्त्याची टेपिस्ट्री करण्यात आली होती. अशा प्रकारचं कलेक्शन अनेक वर्षानुवर्षे चर्चेत राहतं. असेही यावेळी तरुण म्हणाले.
रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीने गोव्यात लग्नगाठ बांधली. रकुल आणि जॅकी यांनी त्यांचं लग्न अतिशय प्रायव्हेट ठेवलं होतं. या लग्नसोहळ्यासाठी फक्त त्यांच्या कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींना आमंत्रण देण्यात आलं. अखेर त्यांनी आनंद कारज पद्धतीने विवाह केला. या विवाह पद्धतीला शीख धर्मात खूप महत्व आहे.