IND vs AUS Final Ram Charan Upasana: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. आता अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि त्याची पत्नी उपासना (Upasana) कामिनेनी कोनिडेला यांनी टीम इंडियाला पाठिंबा दर्शवला आहे. उपासनाने इंस्टाग्रामवर रामसोबतचा एक फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, “माझे भारतावर प्रेम आहे.
पहिल्या फोटोत, रामच्या घातलेल्या जर्सी पाठीवर ‘राम’ शब्द लिहलेला दिसत आहे. उपासनाने पांढरा टी-शर्ट आणि काळी पँट घातली होती. तर दुसऱ्या फोटोत, या कपलचा हटका अंदाज बघायला मिळत आहे.
अनेकवर्ष डेटिंग केल्यानंतर 2012 मध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली. राम चरण आणि उपासना कामिनेनी यांनी 20 जून रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. या जोडप्याने त्यांच्या मुलीचे नाव क्लिन कारा कोनिडेला असे ठेवले आहे. दरम्यान, वर्क फ्रंटवर राम चरण पुढे दिग्दर्शक शंकरच्या आगामी अॅक्शन फिल्म ‘गेम चेंजर’ मध्ये अभिनेता कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे.
‘गेम चेंजर’ हा सिनेमा तेलगू, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात एसजे सूर्या, जयराम, अंजली आणि श्रीकांत यांच्याही भूमिका आहेत. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला 50 षटकात 240 धावांवर गुंडाळले. कर्णधार रोहित शर्मा (31 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 47), विराट कोहली (63 चेंडूत 54 धावा, 4चौकारांसह) आणि केएल राहुल (107 चेंडूत 66 धावा, 1चौकार) यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा IFFI मध्ये विशेष पुरस्काराने सन्मान
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने (3/55) सर्वोत्तम गोलंदाजी केली. कर्णधार पॅट कमिन्स (2/34) आणि जोश हेझलवूड (2/60) यांनीही चांगली गोलंदाजी केली. अॅडम झाम्पा आणि ग्लेन मॅक्सवेलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताची सुरुवात चांगली झाली आणि ऑस्ट्रेलियन संघ 47/3 वर बाद झाला. ट्रॅव्हिस हेड (120 चेंडूत 137, 15 चौकार आणि चार षटकारांसह) आणि मार्नस लॅबुशेन (110 चेंडूत 58, चार चौकारांसह) यांच्या खेळींनी भारतीय संघाला सात विकेट्सने विजय मिळवून दिला. मोहम्मद शमीने एक तर जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या आहेत. शतकासाठी ट्रॅव्हिसला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ देण्यात आला.