धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा IFFI मध्ये विशेष पुरस्काराने सन्मान

धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा IFFI मध्ये विशेष पुरस्काराने सन्मान

Madhuri Dixit : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. कधी ‘मोहिनी’ तर कधी चंद्रमुखीच्या भूमिकेत माधुरी दीक्षितने प्रत्येक वेळी तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिच्या पात्रात जीव ओतला आहे. आजही जगाला तिच्या अभिनयाच्या शैलीने भुरळ घातली आहे. तिच्या अतुलनीय सौंदर्यासोबतच माधुरी दीक्षित एक अप्रतिम नृत्यांगना देखील आहे.

माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्काराने गौरव
माधुरीला ’54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये (IFFI 2023) विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली होती.

धक धक गर्लचा सिनेमॅटिक प्रवास अतिशय सुंदर शैलीत सांगितला
अनुराग ठाकूर यांनी लिहिले की, ‘माधुरी दीक्षितने 4 दशकांपासून तिच्या प्रतिभेने आणि अभिनयाने चित्रपट उद्योगात अमीट ठसा उमटवला आहे. ‘निशा’ पासून ते ‘चंद्रमुखी’ पर्यंत, ‘बेगम पारा’ पासून अदम्य ‘रज्जो’ पर्यंत तिच्या अष्टपैलुत्वाला मर्यादा नाही.

Tiger 3: कतरिना कैफ अन् भाईजानच्या ‘रुआन’ गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मन !

त्यांनी पुढे लिहिले, ‘माधुरी दीक्षित यांनी चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या असामान्य प्रतिभेची छाप निर्माण केली आणि दीर्घ काळ जनमानसांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे, भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे.’

अखेर प्रतीक्षा संपली! रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

दरम्यान, माधुरी दीक्षितने वैविध्यपूर्ण भूमिका जिवंत करत अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान’ पुरस्कार माधुरी दीक्षितच्या भारतीय सिनेमावरील दीर्घकालीन प्रभावाची प्रचीती देतो. 1980, 1990 आणि 2000 च्या दशकात हिंदी चित्रपटांसाठी माधुरी दीक्षितला सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

सलोनी बत्रा साकारणार रणबीरच्या बहिणीची भूमिका; ‘या’ सिनेमाच्या पडद्यामागील फोटो Viral

विक्रमी चौदा वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी तिला नामांकन मिळाले आहे. माधुरी दीक्षित यांनी ‘अबोध’ (1984) या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि ‘तेजाब’ (1988) चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 2014 मध्ये तिची भारतातील युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube