Ramayan serial telecast : 90 च्या दशकात सर्वात लोकप्रिय रामायण मालिकेचे प्रसारण (Ramayan serial telecast) 5 फेब्रुवारीपासून दूरदर्शनच्या डीडी नॅशनल (DD National) वाहिनीवर दुपारी 12 आणि सायं. 5 वाजता पुन्हा सुरू होणार आहे. 90 च्या दशकात ही मालिका लहानथोरांसह सर्वांनीच पाहिली होती, हे रामयण बघत अनेकांचं बालपण गेले आहे. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोची क्रेझ आजच्या काळातही दिसून येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील सोहळा (Ayodhya Ram Mandir) झाल्यानंतर पुन्हा रामायण मालिका दाखवण्याची मागणी वाढली होती. दरम्यान, डीडी नॅशनल वाहिनीने प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी देताना रामायण मालिका पुन्हा सुरू करण्याबाबत ट्विट केले आहे.
दूरदर्शनने रामायणाचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की- ‘रिपु रन जिती सुजस सूर गावत, सीता सहित अनुज प्रभू आवत…’ संपूर्ण भारतातील सर्वात लोकप्रिय रामायण शो पुन्हा एकदा परत आला आहे. रामानंद सागर यांचे रामायण डीडी नॅशनलवर लवकरच पाहा. या व्हिडीओच्या सुरुवातीला लिहिले आहे की – राम मंदिर प्राणप्रतिष्ठा नंतर… भारतीयांचा लोकप्रिय शो रामायण दूरदर्शनवर परत येत आहे. त्यानंतर शोचे काही दृश्य दाखवले आहेत.
World Cancer Day: आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरासाठी खास पोस्ट; म्हणाला, ‘मला तुझा…’
दररोज दोनदा प्रसारित केले जाईल
रामायणाचा शो 5 फेब्रुवारीपासून दररोज संध्याकाळी 5 वाजता डीडी नॅशनलवर दाखवला जाईल आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रसारित होईल.
शोचे स्टारकास्ट
स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर या शोमध्ये अरुण गोविलने श्री रामाची भूमिका साकारली होती, दीपिका चिखलियाने माता सीतेची भूमिका केली होती आणि सुनील लाहिरीने लक्ष्मणाची भूमिका केली होती. हा शो पहिल्यांदा 1987 मध्ये दूरदर्शनवर सुरू झाला होता आणि आजही लोकांना या शोमधील प्रत्येक पात्र आवडते, इतकेच नाही तर आजही लोक अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांना राम-सीता म्हणून पाहतात.
Back by popular demand!
Ramayan returns on DD National, starting tomorrow, 5th Feb, everyday at 6 PM. #RamayanOnDD | #Ramayan | @arungovil12 | @ChikhliaDipika | @LahriSunil https://t.co/eDJuT8rkN4
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) February 4, 2024
अनुष्का- विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा! माजी खेळाडूने दिली गोड बातमी
मंगल भवन अमंगल हारी।
द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी॥धर्म, प्रेम और समर्पण की अद्वितीय गाथा…एक बार फिर आ रहा है पूरे भारत का सबसे लोकप्रिय शो 'रामायण', देखिए #DDNational पर 5 फरवरी से प्रतिदिन शाम 6 बजे और पुनः प्रसारण दोपहर 12 बजे। #Ramayan | @arungovil12 | @ChikhliaDipika |… pic.twitter.com/s6wpBr2aHn
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) February 4, 2024
लॉकडाऊनच्या काळातही रामायण दाखवले
नुकतेच अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्यात रामायणातील राम-सीता आणि लक्ष्मणही सहभागी झाले होते. राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामायणाचे पुन्हा एकदा प्रक्षेपण करण्याची मागणी करण्यात आली होती. याआधीही कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये रामायण पुन्हा प्रसारित करण्यात आले होते आणि त्यावेळीही ते खूप पाहिले गेले होते.