Download App

या पुरस्कारासाठी अत्यंत कृतज्ञ; दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राणी मुखर्जीने व्यक्त केल्या भावना

  • Written By: Last Updated:

Rani Mukharji : मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे ( Mrs. Chatterjee vs Norway ) मधील हृदयस्पर्शी अभिनयाने प्रचंड समीक्षक आणि व्यावसायिक प्रशंसा मिळवणारी बॉलिवूडची आयकॉन राणी मुखर्जी ( Rani Mukharji ) हिला नुकत्याच झालेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

रोहित पवारांना पाडण्यासाठी अजितदादा अन् राम शिंदे यांचे प्लॅनिंग : नामचिन गुंडाच्या भावासोबत खलबत!

पुरस्कार मिळाल्यावर राणीने भावना व्यक्त केल्या, ‘मला वाटते की मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे हा आपल्या देशाबाहेर भारतीय काय अनुभवतात या दृष्टीने हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. जेव्हा ही स्टोरी माझ्यापर्यंत आली. तेव्हा एका आईला अशी वागणूक दिली जाते. हे जाणून मला धक्काच बसला. आणि तिची मुलं तिच्यापासून कशी हिरावून घेतली गेली. एक आई म्हणून ही गोष्ट मला खूप भावली आणि मला वाटलं की, ही गोष्ट सगळ्यांना सांगायला हवी. आणि मी हा चित्रपट केला.

अजितदादांपेक्षाही वळसे पाटलांनी केलेली जखम मोठी आहे… पवार सहज विसरणार नाहीत!

ती पुढे म्हणाली, “जेव्हा मी या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली आणि जेव्हा मला ही कथा कळली तेव्हा माझ्या मनात खूप उत्साह होता. मी शूटिंग करत असताना माझ्या मनात फक्त एक गोष्ट होती – ती म्हणजे मला माझ्यापेक्षा जास्त द्यायचे होते. 100% सागरिकाची ही कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी आणि ती खरी वाटावी आणि लोक मला विसरतील पण देविका चॅटर्जी माझ्यात दिसावी अशा पद्धतीने दाखवता यावी.

एकनाथ खडसे भाजपात येणार? रक्षा खडसेंचं सूचक विधान

त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते आणि मी खूप आनंदी आणि आभारी आहे की, प्रेक्षकांना तो आवडला आणि त्यांनी MCVN ला खूप प्रेम दिले, मी या पुरस्कारासाठी खरोखर आभारी आहे आणि खूप नम्र आहे. मला हा सन्मान दिल्याबद्दल दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आभार. पुरस्कार जिंकण्यासाठी विशेषत: जेव्हा प्रेक्षकांना तुमचे काम आवडते आणि ते तुम्हाला बॉक्स ऑफिसवर प्रथम पुरस्कार देतात आणि चित्रपटासाठी या अद्भुत छोट्या स्मृतिचिन्हांद्वारे दुसरे पुरस्कार देतात.

जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणे भोवले… संगिता वानखेडेंना थेट घरी घुसून धमकावले

राणीने तिच्या मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला, जिथे तिने आपल्या मुलांना परत जिंकण्यासाठी एका देशा विरुद्ध लढा देणाऱ्या एका उत्कट स्त्रीची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आणि या महामारीनंतरच्या जगात कंटेंट सिनेमा लोकांना थिएटरमध्ये खेचू शकतो हा विश्वास परत आणला. राणी जगभर मोठ्या पडद्यावर चमकत राहिली; या प्रतिष्ठित पुरस्काराने तिचे स्थान आजवरच्या सर्वात प्रभावशाली आणि प्रशंसनीय अभिनेत्रीन पैकी एक म्हणून आणखी मजबूत केले आहे.

रेड कार्पेटवर चमकदार काळ्या साडीत राणी अतिशय सुंदर दिसत होती. या सुंदर अभिनेत्री सोबत सुपरस्टार शाहरुख खानने रेड कार्पेटवर सामील झाला, किंग खान आणि बॉलीवूड क्वीन यांनी एकत्र त्यांच्या चित्रांसह इंटरनेट ब्रेक केले होते. विशेष म्हणजे 2023 मध्ये झालेल्या IFFM आणि जागरण चित्रपट महोत्सवानंतर राणीने मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे साठी मिळवलेला हा तिसरा पुरस्कार आहे.

follow us