जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणे भोवले… संगिता वानखेडेंना थेट घरी घुसून धमकावले

जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणे भोवले… संगिता वानखेडेंना थेट घरी घुसून धमकावले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणे त्यांच्याच जुन्या सहकारी संगिता वानखेडे (Sangita Wankhede) यांना भोवले आहे. एका कार्यकर्त्याने वानखेडे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरातील निवासस्थानी जाऊन वानखेडेंना धमकावले असल्याची माहिती आहे.

“तु राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात का बोलतेस? तु जरांगे पाटील यांच्याविरोधात बोलते? असं म्हणत राहुल नामक एका इसमाने संगीता वानखेडे धमकावले आहे. दरम्यान, संगीता वानखेडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेल्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना देखील धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे. (Threat to sangeeta Wankhede by women after criticized Maratha reservation activist Manoj Jarange Patil)

संगीता वानखेडेंकडून जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप :

अजय बारस्कर महाराजांनंतर लेट्सअप मराठीशी बोलताना संगिता वानखेडे यांच्याकडून मनोज जरांगे यांची पोलखोल करण्यात आली होती. वानखेडे म्हणाल्या होत्या की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतच्या अनेक क्लिपा आहेत. पुढील काही दिवसांतच त्या क्लिपा बाहेर येणार आहेत. ज्यावेळी क्लिपा बाहेर येतील ना तेव्हा मराठा बांधव मनोज जरांगेंना पळून पळून मारणार आहे, असे ते म्हणाले होते.

‘काही दिवसांनी मनोज जरांगेच्या क्लिप बाहेर येणारच’; महिला साथीदाराकडून पोलखोल

अजय बारस्कर महाराजांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी मनोज जरांगे यांनी बाईट दिली आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, यामध्ये आणखीन काही दहा पंधरा लोकं आहेत. म्हणजेच मनोज जरांगे यांचे विचार न पटलेले दहा ते पंधरा लोकं मनोज जरांगे यांच्यापासून फुटलेले आहेत, ते मनोज जरांगे यांना माहिती आहेत, पण आम्हाला माहित नाही, तेही समोर येणार असल्याचा दावा संगिता वानखेडेंनी केला आहे.

ट्रोलिंग, धमकी, शाब्दिक बलात्कारावर कधी बोलला का? वानखेडे जरांगेंवर भडकल्या…

अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रापर्यंत मराठा आंदोलनामध्ये मीही सहभागी होतेच. पण काही कारणास्तव मला घरी थांबवावं लागत होतं. त्यामुळे मी अंतरवली मुंबईला गेले नव्हते. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही मनोज जरांगे यांना पाठिंबा देत होतो. जर मी अंतरवलीमध्ये असते तर मनोज जरांगेला नागडा केला असता, मी अनेक चुकीच्या माणसांच्या वाट लावलेल्या आहेत, या शब्दांत संगिता वानखेडेंनी मनोज जरांगे यांना एक इशाराच त्यांनी दिला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज