अजितदादांपेक्षाही वळसे पाटलांनी केलेली जखम मोठी आहे… पवार सहज विसरणार नाहीत!

अजितदादांपेक्षाही वळसे पाटलांनी केलेली जखम मोठी आहे… पवार सहज विसरणार नाहीत!

“त्यांना सर्व काही दिले. त्यांना आमदार केले, मंत्रिपद दिले, विधानसभा अध्यक्षपद दिले आणि साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पदही दिले. मात्र, त्यांनी पाच टक्केही निष्ठा राखली नाही. ते गेले. शरद पवार यांच्या मंचरमधील भाषणातील या एका वाक्यात एकाच वेळी दु:ख आहे, राग आहे आणि बदल्याची आगही आहे. हे दु:ख आहे ते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी साथ सोडल्याचे. हा राग आहे आपल्या पुतण्याला न दिलेली पदे देऊनही वळसे पाटील यांनी उलटी आपल्यावरच टीका केल्याचा आणि ही आग आहे आता त्याच वळसे पाटील यांना धडा शिकविण्याची. कारण पवार यांच्यासाठी अजितदादांनी दिलेल्या जखमेपेक्षाही वळसे पाटील यांनी दिलेली जखम मोठी आणि खोल आहे. त्यामुळे पवार हे दु:ख, हा राग सहजासहजी विसरणार नाहीत आणि ही आगही लवकर शांत होणारी नाही.

काय आहेत यामागची कारणे? पाहुयात…

अजित पवार (Ajit Pawar) यांचं बंड किंवा नाराजी शरद पवार यांना अपेक्षितच होते. गेले काही वर्ष पवार यांना अजितदादांच्या नाराजीविषयीची पूर्ण कल्पना होती. ही नारीज दूर करण्याचे काम पवार यांनी वेळोवेळी वळसे पाटील यांच्यावरच सोपवले होते. वळसे पाटील बोलले म्हणजे पवार यांचेच ते मत आहे अशी धारणा राष्ट्रवादी आणि इतर पक्षातही होती. प्रफुल्ल पटेल-अजित पवार हे 2019 पासूनच राष्ट्रवादीने भाजपसोबत जावं या मतासाठी आग्रही होते. त्या गटात दिलीप वळसे पाटील नव्हते. शरद पवार जिकडे जातील तिथंच वळसे पाटील हे गृहीत होतं.

एकनाथ खडसे भाजपात येणार? रक्षा खडसेंचं सूचक विधान

पण वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तीकर खात्याने छापेमारी केली होती. यामुळे वळसे पाटील देखील भाजपसोबत जावं आणि कटकट संपवावी या मताचे झाले असे बोलले जाते. मात्र पवारांसाठी हा धक्का होता. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांनी देखील वळसे पाटील यांना मानस पुत्र मानले होते. पण आपणच बोट धरुन राजकारणात आणलेला मुलगा आपल्याचविरोधात बंडखोरी करेल याची कल्पनाही पवार यांनी कधी केली नसावी. त्यामुळेच वळसे पाटील यांनाच धडा शिकविण्याचे पवार यांनी मनावर घेतले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांचं नातं पिता-पुत्राप्रमाणे मानलं जात होतं. दिलीप वळसे पाटील यांचे वडील आंबेगावचे माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील आणि शरद पवार यांची घनिष्ठ मैत्री होती. दत्तात्रय वळसे पाटील यांच्यामुळेच दिलीप वळसे पाटील पवारांना भेटले. पवार यांनी त्यांना राज्य सहकारी बँकेत नोकरीला लावले. पुढे पुलोदच सरकार गेल्यानंतर पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यावेळी दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करु लागले.

‘मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवारांच्या हाती’; जरांगेंच्या महिला सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

इथूनच त्यांची पवारांच्या सावलीत कारकीर्द सुरु झाली. तब्बल आठ वर्ष स्वीय सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर 1990 साली शरद पवार यांनी वळसे पाटील यांना राजकारण की मंत्रालयातील काम असे दोन पर्याय ठेवले. त्यावेळी वळसे पाटील यांनी राजकारणाचा पर्याय निवडला. 1990 साली विधासभा निवडणकू जिंकून ते आमदार झाले. त्यानंतर ते सातत्याने इथून आमदार म्हणून निवडून येत आहेत. कधी मंत्री तर कधी विधान सभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर गृहमंत्री कोणाला करायचे हा पेच पवार यांच्यासमोर होता. तेव्हा त्यांनी आपल्या पुतण्यालाही मागे सारत वळसे पाटील यांच्या पारड्यात वजन टाकलं. कधी काळी पवारांनी बँकेत चिटकवलेला तरुण राज्याच्या गृहमंत्री झाला होता. मात्र आता हेच वळसे पाटील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. शिंदे सरकारमध्ये ते मंत्रीही झाले आहेत. त्यामुळेच पवार यांच्यासाठी पुतण्या अजित पवार यांनी दिलेल्या जखमेपेक्षाही वळसे पाटील यांनी दिलेली जखम खोल आणि मोठी आहे. त्यामुळेच त्यांनी ही जखम न विसरता मानसपुत्रालाही झटका देण्याची तयारी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज