एकनाथ खडसे भाजपात येणार? रक्षा खडसेंचं सूचक विधान

एकनाथ खडसे भाजपात येणार? रक्षा खडसेंचं सूचक विधान

Raksha Khadse On Eknath Khadse : मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेते भाजपात जात असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उठलेली बोंब अद्यापही कायमच आहे. आधी जयंत पाटील त्यांनंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबतही भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच खडसेंच्या सुनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी सूचक विधान केलं आहे. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असल्याचं रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) स्पष्ट केलं आहे.

‘कांद्याचा वांदा’ : महायुतीसाठी ‘7 लोकसभा अन् 32 विधानसभा मतदारसंघात’ धोक्याची घंटा

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपात जाणार असल्याच्य वावड्या उठल्या होत्या. जयंत पाटील यांच्याबाबतही ही अफवा पसरली होती. अखेर जयंत पाटलांनी स्वत: पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. आता राष्ट्रवादीचे दुसरे महत्वाचे नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ खडसे यांच्याबाबतही अशीच चर्चा सुरु झाली आहे. त्यातच रक्षा खडसेंच्या विधानामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाला अधिक दुजोरा मिळाला आहे.

अशोक चव्हाण, नारायण राणे अन् SM कृष्णा.. माजी मुख्यमंत्र्यांनीही सोडला काँग्रेसचा ‘हात’

रक्षा खडसे म्हणाल्या, मागील अनेक वर्षांपासून एकनाथ खडसे काम करीत आहेत. जळगाव जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की एकनाथ खडसे यांनी भाजपात येऊन काम केलं पाहिजे. मागील काळात इतर पक्षातील बरेचसे मोठे नेते भाजपात येत आहेत.
एकनाथ खडसेंबद्दल मी एवढं सांगू शकत नाही, पण तो वरच्या पातळीचा विषय आहे. वरिष्ठांच्या निर्णयानंतर एकनाथ खडसे यांचं मत काय आहे, हे सगळं घडल्यानंतरच आपल्याला समजणार असल्याचं रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. ते भाजपात यावेत अशी अनेकांची इच्छा आहे, जर ते आले तर या गोष्टींचा सर्वांनाच आनंद होणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

Maratha Reservation : शिंदे सरकारचं आरक्षण मंजूर नाही; जरांगेंनी इशारा देत पुन्हा उपसलं हत्यार

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर असल्याचं रक्षा खडसेंकडून सांगण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या रावेर मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. मागील काही दिवसांपासून खडसे पुन्हा भाजपात येतील अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या, त्यानंतर आता रक्षा खडसेंनी केलेलं विधान अत्यंत सूचक असल्याचं मानलं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube