Video: रणवीरनं बायकोला दिलं सरप्राइज; भर मुलाखतीत असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल

Ranveer Singh Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक सेलिब्रिटीचा व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Dipeeka Padukone) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील दीपिका आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.   View this post on Instagram […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 12T171104.677

Ranveer Singh Viral Video

Ranveer Singh Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक सेलिब्रिटीचा व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Dipeeka Padukone) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील दीपिका आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.


सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ बराच व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोण ‘टाइम’ मासिकासाठी मुलाखत देत असताना रणवीर तिला सरप्राइज देण्यासाठी स्टुडिओमध्ये येतो आणि त्यानंतर जे काही होतं ते या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये रणवीर सिंग पत्नी दीपिका पदुकोणला सरप्राइज देण्यासाठी तिच्या मुलाखतीच्या स्टुडिओमध्ये अचानक आला असल्याचे दिसून येत आहे.

त्यानंतर दोघं एकमेकांचे हात पकडतात आणि अचानक एकमेकांना लिप लॉक किस करत असलयाचे दिसून आले आहे. यानंतर रणवीर तिथून निघून गेला आहे. दीपिका आणि रणवीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यावर त्यावर या दोघांच्या चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रणवीर आणि दीपिका भूटान येथे व्हेकेशनसाठी गेले होते.

‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आत्माराम भिडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

या व्हेकेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. व्हेकेशनवरून परत भारतात परतल्यावर तिने दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने पती रणवीर सिंगचे खूपच कौतुक केले जात असल्याचे दिसून आले होते. ती म्हणाली होती, मी जेव्हा रणवीरसोबत असते, तेव्हा माझा वावर खूपच सहज असतो. त्याने नेहमीच मला, माझ्या स्वप्नांना आणि माझ्या गरजांना सर्वात अगोदर प्राधान्य दिले आहे.

Exit mobile version