Download App

रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ, HIBOX घोटाळा प्रकरणी पोलिसांनी बजावली नोटीस

Rhea Chakraborty : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री रिया

  • Written By: Last Updated:

Rhea Chakraborty : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला HIBOX ॲप घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. रियाने (Rhea Chakraborty) जाहिरातींद्वारे लोकांना या ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते. माहितीनुसार, Hibox ॲपशी संबंधित प्रकरणात 500 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता.

तर दुसरीकडे या या प्रकरणात मुख्य आरोपी शिवराम याला दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. शिवरामने (Shivram) नोव्हेंबर 2016 मध्ये सवरुल्ला एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली होती त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये Hibox ॲप (HIBOX scam) लाँच करण्यात आले होते. मात्र या ॲपद्वारे सुमारे 30 हजार लोकांची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात अनेक प्रसिद्ध स्टार्स आणि हाय-प्रोफाइल यूट्यूबर्सचाही सहभाग आहे. Hibox ॲपची गुंतवणूक योजना म्हणून जाहिरात करण्यात आली होती.

गुंतवणूकदार या ॲपमध्ये साइन अप करून आर्थिक गुंतवणूक करत होते. गुंतवणूकदारांना या ॲपच्या माध्यमातून एक ते पाच टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचा दावा करण्यात येत होता. हे ॲप एका महिन्यात गुंतवणूकदारांना 30-90 टक्के परताव्याची हमी देण्याचा देखील दावा करतो.

माहितीनुसार, गुंतवणूकदारांना सुरुवातील परतावा देखील मिळाला मात्र जुलै 2024 मध्ये तांत्रिक त्रुटी आणि कायदेशीर वैधतेचे कारण देत या ॲपमध्ये पेमेंट थांबवण्यात आले होते.

शेष भारताचे स्वप्न भंग, 27 वर्षांनंतर मुंबईने जिंकले इराणी चषक

या ॲपची जाहिरात कॉमेडियन भारती सिंग, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, यूट्यूबर एल्विश यादव, लक्ष्य चौधरी, अभिषेक मल्हान यांनी केली होती. त्यामुळे आता या प्रकरणात तपास करताना पोलीस या घोटाळ्याशी संबंधित लोकांना नोटीस पाठवत आहेत आणि त्यांना चौकशीसाठी बोलावत आहेत.

follow us