Download App

बॉलिवूडला मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची ओढ; साऊथचा ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका

आता आणखी एका सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. निर्माता संदीप सिंह यानं 'द प्राइड ऑफ भारत, छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमाची

  • Written By: Last Updated:

Rishabh Shetty Role of Chhatrapati Shivaji Maharaj : महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पराक्रमी सरदार, मराठ्यांचा वैभवशाली इतिहास यांची भुरळ मराठीनंतर आता बॉलिवूड तसंच साऊथच्या सिनेसृष्टीला पडल्याचं दिसून येतंय. गेल्या काही वर्षांत शिवकालीन सिनेमांना मिळालेल्या यशानंतर एकामागोमाग (Rishabh Shetty) एक असे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडकू लागले आहेत. त्यातूनच भव्यदिव्य असे ऐतिहासिक चित्रपट एकामागोमाग एक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला अमेरिकेत अटक, नक्की काय आहे प्रकरण?

आता आणखी एका सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. निर्माता संदीप सिंह यानं ‘द प्राइड ऑफ भारत, छत्रपती शिवाजी महाराज’ या सिनेमाची घोषणा केली आहे. संदीप सिंहनं एक खास पोस्ट शेअर करत या सिनेमाबद्दल सांगितलं आहे. ‘द प्राइड ऑफ भारत, छत्रपती शिवाजी महाराज’ असं या सिनेमाचं नाव आहे.तर साऊथचा मोठा स्टार या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टरही समोर आलं असून अभिनेता ऋषभ शेट्टी या सिनेमात शिवरायांची भूमिका साकारत आहे.

या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंस्टचा वर्षाव केला आहे. हा केवळ एक चित्रपट नाही – आलेल्या सर्व संकटांशी लढा देणाऱ्या, मुघल साम्राज्याच्या सामर्थ्याला आव्हान देणाऱ्या आणि कधीही न विसरता येणारा वारसा तयार निर्माण करणाऱ्या महान योद्ध्याचा गौरव करण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचं निर्माता संदीप सिंहनं म्हटलं आहे. दरम्यान, हा सिनेमा इतक्यात प्रदर्शित होणार नाहीये. सध्या या सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा दोन २०२७ मध्ये २१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी म्हटलंय.

follow us