Rishabh Shetty: ‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टीने पायरसीविरोधात उठवला आवाज; म्हणाले, दरवर्षीचे नुकसान…’
Rishabh Shetty On Piracy: गेल्या वर्षी 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट ‘कंतारा’ने (KANTARA) जगभरात मोठा धमाका केला आहे. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्याच्या कथेच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर (box office) प्रचंड कमाई केली आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. अभिनयासोबतच ऋषभ शेट्टीने (Rishabh Shetty) याचे दिग्दर्शनही केले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऋषभ शेट्टी एका रात्रीत स्टार झाला.
Major action to curb film piracy as industry faces losses of Rs. 20,000 crore annually due to piracy
CBFC and @MIB_India officers authorised to direct blocking/take down of any website/App/link carrying pirated filmic content https://t.co/TcYkXrjMYG
— Rishab Shetty (@shetty_rishab) November 3, 2023
आता कांतारा स्टारने पायरसीविरोधात (Piracy) नाराजी व्यक्त केली आहे. ऋषभ शेट्टीने त्याच्या सोशल मीडिया (social media) अकाऊंटवर सरकारकडून एक प्रसिद्धीपत्रक शेअर करण्यात आला आहे. हे शेअर करत असताना त्यांनी लिहिले आहे की, ‘आम्हाला पायरसीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. पायरसीमुळे आपल्या फिल्म इंडस्ट्रीला दरवर्षी 20 हजार कोटी रुपयांचे मोठे नुकसान होत आहे.
सोबतच त्याने आपल्या चाहत्यांना आवाहनही केले आहे की, त्यांनी पायरेटेड चित्रपट दाखवणाऱ्या सर्व वेबसाईट ब्लॉक कराव्यात. त्यांचे हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या निर्णयावर चाहते त्याला पूर्ण पाठिंबा देत आहेत. ‘कंतारा’ सुपरहिट ठरल्यानंतर आता त्याच्या प्रीक्वलबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. त्याचे बजेट 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे, जे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. ‘कंतार’ फक्त 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिकची कमाई केली होती.
Ira khan Kelvan: नाकात नथ, कपाळी टिकली अन्…; आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण
‘कांतारा’ कन्नडमध्ये 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. 31 ऑक्टोबरपर्यंत, चित्रपटाने जगभरात 250 कोटींची कमाई केली आहे. रक्षितचा ‘777चार्ली’ जूनमध्ये प्रसिद्ध झाले. या चित्रपटाने जगभरात सुमारे 103 कोटी रुपयांची कमाई केली. हे दोन्ही चित्रपट आजवरच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या कन्नड चित्रपटांच्या यादीत आहेत.