Ira khan Kelvan: नाकात नथ, कपाळी टिकली अन्…; आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण

Ira khan Kelvan: नाकात नथ, कपाळी टिकली अन्…; आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण

Ira khan Kelvan: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) विस्की लेक आयरा खानचा (Ira Khan) शाही विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) आयरा बोहल्यावर चढणार आहे. नुकतेच आयराचे ‘मराठमोळं’ केळवण पार (Ira khan Kelvan) पडले आहे. आयरानं केळवणाच्या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. तसेच मराठमोळं केळवणाच्या कार्यक्रमात आयरानं खास मराठीत उखाणा (Marathi Ukhana) देखील घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)


नाकात नथ आणि पिंक कलरची साडी असा खास हटका लूक आयरानं मराठमोळं केळवणाच्या कार्यक्रमासाठी केला होता. आयरानं तिच्या मराठमोळं केळवणाचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत आयराचा होणारा पती नुपूर देखील दिसत आहे. आयरानं शेअर केलेल्या व्हिडीओत ती मराठीमध्ये उखाणा घेत असल्याचे बघायला मिळत आहे. ती म्हणते, “मला मराठी येत नाही पण पॉपोयसाठी मी कधी नाही म्हणत नाही” उखाणा घेतल्यानंतर आयरा ही नुपूरला खास खाऊ भरवत असल्याचे बघायला मिळत आहे.

आयरानं शेअर केलेल्या मराठमोळं केळवणाच्या कार्यक्रमाच्या फोटोमध्ये अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) देखील बघायला मिळत आहे. आयरानं शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आमिर खानने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की, आयरा ही 3 जानेवारीला बोहल्यावर चढणार आहे. आयरा खान ही फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहे. त्यानंतर त्यांचा शाही लग्नसोहळा राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणी होणार आहे. तसेच 13 जानेवारी दिवशी मुंबईत आयराचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Urfi Javed Viral Video Case: ‘गुन्हा दाखल होताच उर्फीचे भारतातून पलायन’; थेट गाठलं दुबई

आमिरने पुढे म्हणाला आहे की, त्याच्या होणाऱ्या जावयाबद्दल सांगितलं होतं की, “आयरानं निवडलेल्या मुलाचे पेट नेम हे पोपॉय आहे. तो एक ट्रेनर आहे, त्याचे हात पोपॉयसारखे आहेत. परंतु त्याचे खरे नाव नुपूर आहे. तो एक चांगला मुलगा आहे. आयरा ही डिप्रेशनशी झुंज देत होती, तेव्हा तो तिच्यासोबत कायम होता. तो खरोखरच तिच्या पाठीशी कायम उभा राहिला आणि तिला भावनिक आधार दिला आहे, असे यावेळी सांगितले आहे.

आयराचा होणारा पती नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे बघायला मिळाले आहे. आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला होता. आयरा खानच्या साखरपुडासाठी सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबीय हजेरी लावली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube