Download App

Rockstar DSP देणार संगीत रसिकांना पर्वणी; लंडनमध्ये मेस्ट्रो परफॉर्मन्ससाठी सज्ज

Rockstar DSP : पुष्पा चित्रपटातून संगीतकार रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) या नावाने ओळखले जाणारे देवी श्री प्रसाद आता पुन्हा प्रेक्षकांना पुष्पा 2 चित्रपटातून मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणे पुष्पाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भूरळ घातली होती. त्याप्रमाणे पुष्पा 2 चे गाणे देखील प्रेक्षकांना भारावून टाकणार हे नक्की. त्यामध्ये आता ते संगीत रसिकांना आणखी एक खास पर्वणी देत आहेत.

रॉकस्टार डीएसपी देणार संगीत रसिकांना पर्वणी…

रॉकस्टार डीएसपी 13 आणि 14 जानेवारी, 2024 रोजी लंडनमधील त्याच्या आगामी वर्षातील दोन दिवसांच्या मैफिलीसाठी सज्ज झाले आहेत. या कार्यक्रमाने आधीच संगीत रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ज्यामुळे एक अविस्मरणीय संगीतमय प्रवासाची आशा आहे. त्याची अफाट प्रतिभा आणि मनमोहक रंगमंचावरील उपस्थितीमुळे जगभरातील प्रेक्षकांशी घनिष्ठ संबंध आहे.

Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलच्या भावाला वाराणसीतून अटक; पुणे पोलिसांना मोठं यश

त्याच्या लंडन मैफिलीबद्दल विचारले असता ते म्हणाले ‘जानेवारी 2024 मध्ये माझी लंडन कॉन्सर्ट होणार आहे. मी यापूर्वी कधीही लंडनमध्ये कॉन्सर्ट केलेली नाही. हा एक संगीतमय कार्यक्रम असेल. ही घोषणा करताना मला आनंद होत आहे. चाहत्यांनी देखील हा कार्यक्रम चुकवायचा नाही. हा एक भव्य अनुभव असणार आहे.’

>Prajakt Tanpure : आरोग्यमंत्र्यांना लाज वाटत असेल तर राजीनामा द्यावा, आमदार तनपुरे संतापले

दरम्यान पुष्पाच्या संगीतासाठी रॉकस्टार डीएसपी यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर आता प्रेक्षकांच्या आपेक्षा वाढल्या आहेत. कारण त्यांचं संगीत म्हणजे संपूर्ण चित्रपट बांधून ठेवणारा महत्त्वाचा भाग असतो. त्यांचं संगीत चित्रपटाच्या विषयाला तंतोतंत जुळणार असतं. त्याची मधूरता प्रेक्षकांच्या मनात खोलवर रूजते. त्यांना चित्रपटाशी जोडून ठेवते. त्यामुळे चाहते या चित्रपटाची आणि गाण्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

https://youtu.be/PCA55ahwZh8?si=qfdaIyjis5dKCyjU

Tags

follow us