Download App

Pushpa 2: संगीतकार डीएसपी आणि श्रेया घोषालच्या गाण्याची खास झलक पाहिलीत का?

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकाराने 'पुष्पा' मधील 'द कपल सॉन्ग' रिलीज केलं आहे आणि आता हे गाणं किती सुपरहिट होणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Rockstar DSP Shreya Ghoshal Song Release: देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) यांचं ‘पुष्पा: द राइज’मधील (Pushpa 2) ‘सामी सामी’ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं  आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकाराने ‘पुष्पा 2’ मधील ‘द कपल सॉन्ग’ रिलीज केलं आहे आणि आता हे गाणं किती सुपरहिट होणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

रश्मिका मंदान्नाच्या (Rashmika Mandanna) अनोख्या अदा आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका श्रेया घोषालने (Shreya Ghoshal) हे गाणं गायले आहे. गाण्यांपासून ते दमदार बीट्सपर्यंत या ट्रॅकबद्दलची प्रत्येक गोष्ट खास आहे. अपेक्षांच्या पलीकडे जाण्यासाठी डीएसपीचे कौशल्य सिद्ध करते. हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे.

‘द कपल साँग’ हे बहुप्रतिक्षित अल्लू अर्जुन स्टारर चित्रपटातील दुसरे गाणे आहे जे 15 ऑगस्ट रोजी पडद्यावर येणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज झालेला पहिला सिंगल ‘पुष्पा पुष्पा’ आधीच रेकॉर्ड करत आहे. अलीकडे, ते 50 सर्वाधिक वाजलेल्या तेलुगू गाण्याच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. या दोन्ही गाण्यांनी हे सिद्ध केले आहे की ‘पुष्पा 2: द रुल’चा अल्बम चार्टवर राज्य करणार आहे आणि पहिल्या चित्रपटाच्या अल्बमप्रमाणेच कायमचा प्रभाव सोडणार आहे.

‘द कपल सॉन्ग’ च्या झलकाने हे सिद्ध केले आहे की चाहते एका संगीतमय कलाकृतीचे साक्षीदार होणार आहेत जे श्रेया घोषालच्या भावपूर्ण आवाजासह DSP च्या डायनॅमिक गाणं असणार आहे. ‘हिटमेकर अशी ख्याती असलेला डीएसपी आपल्या कामाने भारतीय चित्रपटसृष्टीत बेंचमार्क करत आहे आणि म्हणून ‘पुष्पा 2: द रुल’ साठी सगळेच उत्सुक आहेत.

सिद्धार्थ पी मल्होत्राच्या ‘महाराज’चित्रपटाचं पोस्टर अनोख्या पद्धतीने केलं लाँच; पाहा खास Video

गेल्या काही वर्षांमध्ये डीएसपी हे लोकप्रिय संगीतकारांपैकी एक असल्याचे सिद्ध केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याला केवळ दाक्षिणेतील प्रेक्षकांसाठी स्टेज कसा सेट करायचा हेच माहीत नाही तर बॉलिवूडच्या प्रेक्षकांनाही त्याच्या मनमोहक बीट्सवर खिळवून ठेवणार आहे. आता देश ‘पुष्पा 2: द रुल’ सोबत त्याची जादू बघण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us

वेब स्टोरीज