‘Pushpa 2’ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार DSP आणि श्रेया घोषाल गाणार एकत्र गाणं

‘Pushpa 2’ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार DSP आणि श्रेया घोषाल गाणार एकत्र गाणं

Pushpa 2 : The Rule DSP and Shreya Ghoshal : ‘पुष्पा 2: द रुल’ या (Pushpa 2 : The Rule ) चित्रपटाची उत्सुकता आता सर्वांना आहे. या चित्रपटाविषयी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. जेव्हापासून निर्मात्यांनी चित्रपटाचं दुसरं गाणं ‘द कपल सॉन्ग’ चा टीझर शेअर केला आहे. हे गाणं राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी (DSP ) आणि सदैव मधुर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका श्रेया घोषाल ( Shreya Ghoshal ) यांनी गायलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)


या गाण्याचे शीर्षक ‘अंगारों’, ‘सूसेकी’, ‘सूदाना’, ‘कंडालो’ आहे. ‘नोडोका’ आणि ‘AAGUNER’ अनुक्रमे हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत हे गाणं येणार असून हे गाणं राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी (DSP) आणि सदैव मधुर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांच्यातील हे सहयोग असणार आहे.

‘द कपल सॉन्ग’ च्या झलकाने हे सिद्ध केले आहे की चाहते एका संगीतमय कलाकृतीचे साक्षीदार होणार आहेत जे श्रेया घोषालच्या भावपूर्ण आवाजासह DSP च्या डायनॅमिक गाणं असणार आहे. ‘हिटमेकर अशी ख्याती असलेला डीएसपी आपल्या कामाने भारतीय चित्रपटसृष्टीत बेंचमार्क करत आहे आणि म्हणून ‘पुष्पा 2: द रुल’ साठी सगळेच उत्सुक आहेत.

Cannes 2024 : कान्स 2024 मध्ये भारताचा डंका! FTII विद्यार्थ्याच्या लघुपटाने पुरस्कार जिंकून रचला इतिहास

गेल्या काही वर्षांमध्ये डीएसपी हे लोकप्रिय संगीतकारांपैकी एक असल्याचे सिद्ध केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याला केवळ दाक्षिणेतील प्रेक्षकांसाठी स्टेज कसा सेट करायचा हेच माहीत नाही तर बॉलिवूडच्या प्रेक्षकांनाही त्याच्या मनमोहक बीट्सवर खिळवून ठेवणार आहे. आता देश ‘पुष्पा 2: द रुल’ सोबत त्याची जादू बघण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज