Download App

Rockstar DSP देणार चाहत्यांना सरप्राईज, केली मोठी घोषणा

Rockstar DSP : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP) नुकतंच 'पुष्पा 2: द रुल' मध्ये संगीत

  • Written By: Last Updated:

Rockstar DSP : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP) नुकतंच ‘पुष्पा 2: द रुल‘ मध्ये संगीत दिला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे. यावर्षी तो चित्रपटांमध्ये अनेक भाषांमध्ये संगीत देणार आहे. त्यामुळे त्याचा हा वर्ष खूपच व्यस्त असणार आहे.

यातच आता त्याने जागतिक संगीत दिनानिमित्त त्याच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. या बातमीनुसार त्याने आपल्या इंडिया टूरची घोषणा केली आहे. मात्र या टूरची सुरुवात कोणत्या शहरातून होणार आहे याची घोषणा त्याने केलेली नाही. मात्र जो कोणी या शहराचे नाव सांगणार त्याला मैफिलीचे मोफत तिकीट दिले जाईल अशी देखील घोषणा त्याने केली आहे. त्याचा या गूड न्यूजने संगीत विश्वात आनंदाचा वातावरण निर्माण झाले आहे.

रॉकस्टार डीएसपी लंडन, मलेशिया, यूएसए आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या ठिकाणी आपल्या संगीतने रंगमंचावर आग लावत आहे आणि आता त्याचे भारतीय चाहते रॉकस्टार डीएसपीचा पूर्ण वैभव अनुभवण्यासाठी वाट पाहत आहेत. त्यामुळेच त्याचे चाहत्यांची अशी अपेक्षा आहे की, त्याने दक्षिणेकडील शहरांव्यतिरिक्त मुंबई, दिल्ली आणि इतर उत्तरी शहरांमध्ये परफॉर्म करावे. मात्र तो कोणत्या कोणत्या शहरात परफॉर्म करणार याची तपशील अद्याप देण्यात आलेली नाही.

दरम्यान त्याच्या कामाबद्दल बोलायचं तर रॉकस्टार डीएसपीचा आगामी चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ मधील अलीकडेच रिलीज झालेल्या व्हायरल ट्रॅकसह प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. त्याचे ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘द कपल सॉन्ग’ हे ट्रॅक्स आधीच अनेकांच्या मनावर राज्य करत असून अनेक रेकॉर्ड मोडत आहेत.

ओबीसी बोगस आरक्षण खातायंत, हाकेंचा दोष नाही तर ‘येवल्या’वाल्याचा; जरांगेंनी धू-धू धुतलं…

यापलीकडे रॉकस्टार डीएसपी सुरिया स्टारर ‘कंगुवा’, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगतसिंग’, अजितचा ‘गुड बॅड अग्ली’, नागा चैतन्यचा ‘थंडेल’ आणि धनुषचा ‘कुबेरा’ या सिनेमांमध्ये त्याचे संगीत  दिसणार आहे.

follow us

वेब स्टोरीज