मलेशियात लष्करी हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर, 10 जणांचा मृत्यू

मलेशियात लष्करी हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर, 10 जणांचा मृत्यू

Navy helicopters collide : नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर झाल्याची घटना मलेशिया येथे घडली आहे. या घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होत असतो. (Malaysia) त्या पार्श्वभूमीवर लुमुट येथे रॉयल मलेशियन नेव्ही स्टेडियममध्ये नौदलाचा सराव सुरू होता. त्या सरावादरम्यान दोन्ही लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झाल्याने हा अपघात घडला.

पार्थ पवार यांना थेट ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा! मात्र, सुरक्षा देण्याचं कारण काय?

फक्त दहा जागा लढवणारे देशाचं भवितव्य काय घडवणार? विखेंचा शरद पवारांना खोचक टोला

अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी दावा ठोकत वातावरण तापवलं

मृत्यू झालेले सर्वजण क्रू मेंबर्स

ही घटना घडल्यांतर मनेशियाच्या नौदलाने या घटनेवर एक निवेदन जारी केलय. नौदलाच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ते ५ मे दरम्यान दोन हेलिकॉप्टर तालीम करत होते. परंतु, क्रॅस झाल्याने मोठा अपघात झाला आणि त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण क्रू मेंबर्स होते अशीही माहिती देण्यात आली आहे. तसंच, हे सर्व मृतदेह ओळख पटावी यासठी लुमुट एअर बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे.

 

सखोल चौकशी करण्याचा निर्णय

या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय येथील प्रशासनाने घेतला असून त्यासाठी आयोग स्थापन करण्यात येणार आहे. तसंच, वारंवार लष्करी हेलिकॉप्टर कोसळण्याच्या घटनांबाबत चिंता वाढली असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे. मागील महिन्यातच, मनेशियाच्या सागरी अंमलबजावणी एजन्सीचे हेलिकॉप्टर बचाव कवायती दरम्यान पुलाऊ अंग्सा, सेलंगोरजवळ क्रॅश झालं होत. त्यामुळे याबाबात सखोल चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, Fennec M502 M502-6 आणि HOM M503-3 अशी ही हेलिकॉप्टर होती. अपघातात हे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन एक स्टेडियमच्या पायऱ्यांवर पडलं तर दुसरं स्विमिंग पूलमध्ये पडलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube