ओबीसी बोगस आरक्षण खातायंत, हाकेंचा दोष नाही तर ‘येवल्या’वाल्याचा; जरांगेंनी धू-धू धुतलं…

ओबीसी बोगस आरक्षण खातायंत, हाकेंचा दोष नाही तर ‘येवल्या’वाल्याचा; जरांगेंनी धू-धू धुतलं…

Manoj jarange Patil : ओबीसी बोगस आरक्षण खातायंत, हाकेंचा दोष नाही तर ‘येवल्या’वाल्या काड्या करत असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj jarange) यांनी आज पत्रकार परिषदेत ओबीसी नेत्यांना धू-धू धुतलंय. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे ठाम आहेत तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा छगन भुजबळांसह (Chhagan Bhujbal) लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा साधला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाने कधीच ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी केली नाही.  मंडळ कमिशनने सर्व्हे केला की नाही असं आम्ही कधीही विचारलो नाही. मात्र आज मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे तर ते ओबीसी नेत्यांना पचत नाही. आज सर्वांना माहिती झाले आहे की कोण किती जातीवादी आहे. 10-15 नेते ओबीसींचा वाटोळे करत आहे असं देखील जरांगे म्हणाले. तसेच मराठा नेत्यांना समाजाच्या मागे उभे राहण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.

ओबीसी नेत्यांकडून जातीवाद काय असतो हे शिकावा. ओबीसी बोगस आरक्षण खात आहे.  मंडल कमिशनने फक्त 14 टक्के आरक्षण दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी वरचा आरक्षण लगेच रद्द करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. तर फडणवीस यांच्यावर टीका करत तुम्ही ओबीसी नेत्यांच्या दबावाखाली येऊन मराठा समाजावर 100 टक्के अन्याय करणार आहे. असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसी आंदोलक विरोधक नाही तर ‘येवल्या’वाला काड्या करतोयं…

मराठा समाजाचा ओबीसी समाजबांधव अथवा आंदोलक विरोधक नाही तर येवल्यावाला काड्या करत असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर टोलेबाजी केलीयं. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचा नामोल्लेख टाळला. मात्र त्यांचा रोख भुजबळांकडेच असल्याचं दिसून आलं. लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभे केलंय, आंदोलन करणाऱ्यांना भुजबळ सगळे पुरवत असून जर मी तुमचे राजकीय करियर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी भुजबळांना दिला.

पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांना दिलासा, फडणवीसांनी केली मोठी घोषणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज