मराठा समाज आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप लागली कामाला; चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लॅन

  • Written By: Published:
मराठा समाज आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप लागली कामाला; चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लॅन

BJP attract Maratha community Chandrakant Patil meeting: मुंबईः मराठा समाजाच्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) भाजपला (BJP) जोरदार बसला आहे. नाराज मराठा समाजाला आपल्याकडे खेचण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले आहे. आता काही महिन्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा मतदार आपल्या बाजूला खेचण्यासाठी सरकार आता कामाला लागले आहे. त्यादृष्टीने आता भाजपकडून काही पावले उचलण्यात आले आहे. भाजपचे आमदार, नेते, खासदार यांची एक बैठक आज मुंबईत पार पडली आहे. या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे. या मुद्द्यावरून येत्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election)मराठा मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने मोठ्या प्लॅन आखला असल्याचे स्पष्ट होत आहे.

पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करा नाहीतर विरोधात मतदान.., ओबीसी कार्यकर्त्यांकडून भाजपला इशारा

भाजप कार्यालयातील बैठकांमध्ये विचारमंथन केल्यानंतर नरीमन पाॅईंटमधल्या भाजप प्रदेश कार्यालयात मराठा आमदारांची बैठक चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली. मराठा समाजाच्या नाराजीचा भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात फटका बसला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारस आपल्याकडे कसा पुन्हा आणता येईल, याबाबत चर्चा झाली.

भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण? योगी आदित्यनाथ घेणार सरसंघचालक मोहन भागवतांची भेट; अनेक चर्चांना उधाण

या चर्चानंतर मंत्री चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण व इतर सुविधा देऊनही समाजाचा आमच्याविरोधात असंतोष दिसून आला. खरं तर मराठा समाजाला काय दिले हे सांगण्यात आम्ही कमी पडलोय. अण्णासाहेब पाटील महामंडळाला आम्ही बळकटी दिली आहे. सारथी मार्फत मराठा व कुणबी मुलांना शैक्षणिक कामांसाठी मदत केली आहे. ही माहिती मराठा समाजापर्यंत जाण्यासाठी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आमदारांना याबाबत अपग्रेड राहण्यास सांगण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत 69 हजार जणांना 6 हजार 500 कोटींची मदत केली आहे. ओबीसी समाजाला ज्या सुविधा मिळतात, तेवढ्याच सुविधा मराठाला समाजाला देण्यात आल्या. परंतु याची माहिती नेत्यांना, कार्यकर्त्यांना नाही. तर समाजाला नाही. त्याचा फटका बसला आहे. या सरकारने आरक्षण दिलंय, सुविधा दिल्यात याचे एका अर्थाने ब्रेन स्टॉर्मिंग करण्याची आवश्यकता असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

एक समिती स्थापन करण्यात येत आहे. त्यात भाजपचे दहा बारा नेते, कॅबिनेटचे दहा-बारा मंत्री, मराठा समाजाचे नेते, अशआ एकत्रित समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती मराठा समाजाचे प्रश्न दूर करण्यासाठी काम करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज