पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांना दिलासा, फडणवीसांनी केली मोठी घोषणा

पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांना दिलासा, फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Police Bharti 2024: राज्यात 19 जूनपासून 17 हजार 471 पदांसाठी मेगा पोलीस भरतीची (Police Bharti 2024) सुरुवात झाली आहे. 17 हजार पदांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केला आहे तर दुसरीकडे राज्यातील बहुतेक भागात पावसाची सुरुवात झाल्याने उमेदवारांना मैदानी चाचणी देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतात आहे त्यामुळे अनेक उमेदवारांनी पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

उमेदवारांच्या या मागणीला विरोधी पक्षांकडून देखील पाठिंबा मिळत असल्याने आता राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे.

आज (21जून) माध्यमांशी बोलताना ज्या ठिकाणी पाऊस सुरु आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मैदानी चाचण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देखील युनिट्सला देण्यात आले आहे असेही फडणवीस म्हणाले.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या ज्या ठिकणी पाऊस आहे त्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आले आहे. पुढे ही पावसाचे दिवस आहे आणि त्यानंतर राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे सरकारकडून पोलीस भरती लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न होत आहे. कारण जर या चाचण्या खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिमाण होऊ शकतो कारण अनेकांसाठी ही शेवटीची संधी ठरू शकते त्यांना दुसरी संधी भेटत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस आहे त्यांनी ठिकाणी चाचण्यांसाठी दुसऱ्या तारखा देण्यात आले असं फडणवीस म्हणाले.

तसेच मैदानी चाचणीसाठी उमेदवार दुसऱ्या शहरातून येतात त्यांना राहण्याची जागा नसते त्यामुळे अनेकजण बस स्टॅण्डवर झोपताना दिसतात त्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी भरतीच्या ठिकाणी जवळ असलेल्या मंगल कार्यलयात त्यांनी व्यवस्था करण्यात यावी असे आदेश आम्ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या युनिट्सना दिले असल्याची देखील माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुरलीधर मोहोळ शंकर महाराज मठात दर्शनासाठी आले अन् भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

तर दुसरीकडे दोन समाजात थेड निर्माण होऊ नये, दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे राहू नये आणि दोन्ही समाज अहित होऊ नये असा आमचा प्रत्यन आहे . कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांचे प्रश्न सरकार सोडवणार अशी ग्वाही देखील त्यांनी ओबीसी आरक्षणावर बोलताना दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज