KKK 13: ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये रोहित रॉयला स्टंटबाजी पडली महागात…!

Rohit Roy Injured KKK 13 : ‘खतरों के खिलाडी 13’च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू होताच स्टंटबाजी करत असताना अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) जखमी झाला आहे. यामुळे तो आता मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   View this post on Instagram   A post […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 26T105730.421

Khatron Ke Khiladi 13

Rohit Roy Injured KKK 13 : ‘खतरों के खिलाडी 13’च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू होताच स्टंटबाजी करत असताना अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) जखमी झाला आहे. यामुळे तो आता मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


रोहित रॉयने ‘खतरों के खिलाडी 13’चं (Khatron Ke Khiladi 13) शूटिंग पूर्ण करावं, अशी निर्मात्यांची मोठी इच्छा आहे. पण त्याची जखम बरी होण्यासाठी ववेळ लागण्याची शक्यता आहे. रोहित रॉयला देखील हा कार्यक्रम करण्याची इच्छा आहे. पण गंभीर दुखापत झाल्यामुळे रोहित रॉय मुंबईला रावण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘खतरों के खिलाडी 13’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या सुरक्षिततेकडे रोहित शेट्टी याचे संपूर्ण लक्ष असल्याचे यावेळी सांगितले आहे. आता रोहित रॉय ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये सहभागी होणार नसल्याने त्याचे चाहते खूप नाराज झाले आहेत. रोहित रॉय नक्की कोणतं स्टंट करत असताना जखमी झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. गेल्या काही दिवसापासून ऐश्वर्या शर्माला देखील स्टंट करत असताना दुखापत झाली होती. याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.

‘Raavrambha’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शक महेश टिळेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘खतरों के खिलाडी 13’ रोहित शेट्टी (Rohit Shetty) सोबत या पर्वामध्ये शिव ठाकरे, डेजी शाह, ऐश्वर्या शर्मा, शिझान खान, अंजली आनंद आणि अर्चना गौतम या स्पर्धकांची मोठी खेळी बघायला मिळणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ‘खतरों के खिलाडी 13’चं प्रसारण होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या तेराव्या पर्वात शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकची जोडी दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version