Download App

नॅशनल क्रश रोहित सराफची प्राजक्तासह रोमँटिक हैदराबाद सफर!

Rohit Saraf : नॅशनल क्रश रोहित सराफ (Rohit Saraf) आणि मिस मिसमॅच्ड कोस्टार प्राजक्ता कोळी यांनी हैदराबादमध्ये रोमँटिक स्पार्क अनुभवले. मिसमॅच्डची टीम हैदराबादमध्ये पोहोचताच नॅशनल क्रश रोहित सराफ हा निजामाच्या शहरात मज्जा मस्ती करताना दिसला. शूटच्या सोबतच रोहित आणि प्राजक्ता हे दोघे हैदराबाद फिरताना दिसतात.

फडणवीस अकार्यक्षम, हतबल आणि लाचार, त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही कळेना; पटोलेंचा घणाघात

हैदराबादमध्ये होणाऱ्या त्यांच्या वेब सिरीज मिसमॅच्ड सीझन 3 च्या पुढील भागाचे चित्रीकरण करण्यासाठी ही बहुचर्चित जोडी शहरात आली आहे. त्यांचा प्रवास हा त्यांचा सोशल मीडिया पोस्ट आणि स्टोरी मधून दिसतो आहे. डिंपल आणि ऋषी यांच्या प्रवासातील आणखी एक खास गोष्ट यातून अनुभवयाला मिळणार आहे. रोहित इश्क विश्क रिबाउंडसाठी तयारी करत आहे. चाहते ऋषी आणि डिंपलच्या या जोडी ची वाट बघत असून त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत!

“पूर्वीचे ठाम अन् परखड राज ठाकरे शोधतोय…” : मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीच्या चर्चांवर थोरातांची खोचक टीका

रोहित सराफ हा कायम ट्रॅव्हल करताना दिसतो. आता लवकरच मिसमॅच्ड 3 चा सीजन येणार आहे.चाहत्यांची आवडती वेब सीरिज मिसमॅच्ड 3 ही सुरुवातीपासूनच चर्चेत असलेली सीरिज आहे. सुरुवातीच्या दोन सीझनमध्ये रोहित सराफचे पात्र ऋषी सिंग शेखावत याने प्रेक्षकांना आपलंसं केल आहे. रोमान्स आणि विनोद यांचा अनोखा अंदाज यातून अनुभवयाला मिळाला होता.

‘पुनीत बालन ग्रुप’कडून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ३१ संगणकांची भेट

सीझन 3 ची उत्सुकता बघायला मिळत असून हास्य, प्रेम आणि अप्रत्याशित ट्विस्टने भरलेल्या मिसमॅच्डच्या मनमोहक दुनियेत पुन्हा प्रवेश करण्यास सगळेच उत्सुक आहेत. नॅशनल क्रश असलेला रोहित सराफ (Rohit Saraf) हा नेहमीच त्याच्या फॅशन लूक्सने सगळ्यांची मन जिंकून घेत असतो.

रोहितचे लूक्स हे कायम प्रेक्षकांना मोहित करतात आणि त्याने एक फॅशन आयकॉन म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिसमॅच्ड 3 या वेबसिरीजमध्ये अभिनेता ऋषी सिंग शेखावत ही त्याची लाडकी व्यक्तिरेखा पुन्हा साकारणार आहे आणि तो 2003 च्या कल्ट क्लासिक इश्क विश्कचा सिक्वेल असलेल्या इश्क विश्क रिबाउंडवरही काम करत आहे.

follow us