Download App

Ishq Ka Asar : तुमचे क्षण सुंदर करायला आलंय, स्टॅबिन बेन आणि योगिता बिहानीचं नवं गाणं…

Ishq Ka Asar new song out : पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आवडतो. हा एक रोमॅंटीक ऋतू म्हणून त्याच्याकडे प्रेमी युगुलांकडून पाहिलं जात. त्यात आता या पावसाळ्यात एक रोमॅंटीक गाणं रिलीज झालं आहे. स्टॅबिन बेन आणि योगिता बिहानीचं नवं गाणं ‘इश्क का असर’ रिलाज झालं आहे. हे गाणं एखाद्या चित्रपटातील गाण्यासारखचं सुंदर गाणं आहे. (Romantic song out of Hits Music Ishq Ka Asar )

नगरमध्ये संभाजी भिडेंच्या प्रतिमेला मारले जोडे; पुढील कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी

हे गाणं जॅन-सॅम आणि रईस यांनी कंपोज केलं. तर विशु श्रीवास्तव यांनी लिहिलं आहे. रंजू वर्गीस यांनी हे गाणं जोधपूरच्या सुंदर गल्ल्यांमध्ये हे गाणं शूट करण्यात आलं आहे. यामध्ये स्टॅबिन बेन आणि योगिता बिहानी यांची खास केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणं हिट्स म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आलं आहे. तसेच इतरही त्यांच्या स्ट्रीमिंग साईटवर रिलीज करण्यात आलं आहे.

‘आंग सान स्यू की’ यांना दिलासा, लष्कराकडून पाच प्रकरणांमध्ये माफी

या गाण्याबद्दल सागंताना स्टॅबिन बेन म्हणाला की, या गाण्याच्या बोलचं या गाण्याची जादू सांगत आहेत. त्यामुळे हे गाणं नक्की तुमच्या मनावर राज्य करेल. जॅन-सॅम, रईस आणि विशु श्रीवास्तव यांनी हे गाणं अत्यंत सुंदक केलं आहे. तर रंजूने नेहमीप्रमाणे स्क्रीनवर जादू केली आहे. तर तुम्हीही गे गाणं पाहिलं आणि ऐकलं तर तुम्हाला तुमचे रोमॅंटीक क्षण आठवणार आहेत.

तर हिट्स म्युझिकचे विनोद भानुशाली म्हणाले हिट्स म्युझिक नेहमी असं संगीत आणू इच्छिते जे चाहते आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल. जे मधूर अल्हाददायक, प्रेम, रोमान्स असं स्गळ दाखवू शकेल. त्यामुळे ‘इश्क का असर’ हे गाणं नक्कीचं तुमच्या प्लेलिस्टला जोडले जाईल. तुमच्या आवडत्या गाण्यामध्ये सामील असणार आहे.

Tags

follow us