‘ लेकर हम दिवाना दिल ’ ; ऋणानुबंधची शनिवारी एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन लाईव्ह संगीत संध्या

येत्या २८ जून, शनिवारी वाद्यवृंदासह "लेकर हम दिवाना दिल" या लाइव्ह म्युझिक संध्येचे आयोजन माऊली सभागृह येथे संध्याकाळी साडेपाच वाजता केले आहे.

Rd Burman

S.D. Burman, R.D. Burman live music evening on Saturday

S.D. Burman, R.D. Burman live music evening on Saturday: अहिल्यानगर शहरातील सामाजिक आणि सांगीत क्षेत्रातील नावाजलेली संस्था ऋणानुबंध बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने येत्या २८ जून, शनिवारी वाद्यवृंदासह “लेकर हम दिवाना दिल” या लाइव्ह म्युझिक संध्येचे आयोजन माऊली सभागृह येथे संध्याकाळी साडेपाच वाजता केले आहे.

‘ऋणानुबंध’ अनेक सामाजिक आणि सांगितीक उपक्रम राबवत असते. नामवंत संगीतकार एस.डी. बर्मन आणि आर.डी. बर्मन यांच्या गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा सह मैफिलीचे आयोजन येत्या शनिवारी दि.२८ जून २०२५ रोजी झोपडी कॅन्टीन समोरील माऊली संकुल येथे संध्याकाळी ५ :३० वा. पासून करण्यात आले आहे. बर्मन पितापुत्रांनी संगीतबध्द केलेल्या अनेक अजरामर गीतांची मेजवानी ‘ऋणानुबंध’ चे कलाकार सादर करणार आहेत. तेरे मेरे मिलन की ये रैना, हम दोनो दो प्रेमी, कांची रे कांची रे, भीगी भीगी रातो मे, जय जय शिव शंकर, जानु मेरी जान, यम्मा यम्मा, कोरा कागज था ये मन मेरा इत्यादी गाजलेली गाणी या कार्यक्रमात सादर होणार आहेत. (S.D. Burman, R.D. Burman live music evening on Saturday)

या कार्यक्रमात अजित रोकडे, डॉ. दमन काशिद, प्रशांत बंडगर, महेश घावटे, डॉ. शैलेंद्र खंडागळे, डॉ. विवेकानंद कंगे, सारंग पंधाडे, अजय आदमाने, भानुदास महानुर, चारुदत्त ससाणे, संजय भिगारदिवे, सारिका रघुवंशी, प्रतिभा साबळे, सीमा रघुवंशी, मोनाली बोरुडे, डॉ. गायत्री कुलकर्णी इत्यादी कलाकार गीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक शिंगवी ज्वेलर्स, माधवबाग साईमाऊली हॉस्पिटल, डॉ. दमन काशीद हॉस्पिटल, स्नेहदीप हॉस्पिटल, साताळकर लोटस, झेंडे हॉस्पिटल हे आहेत.

हा कार्यक्र प्रेक्षकांना विनामुल्य पाहता येणार असुन उपस्थित प्रेक्षकांना माधवबाग कडून विविध चाचण्यांवर डिस्काउंट कुपन दिले जाणार आहे. काही भाग्यवान प्रेक्षकांना लकी ड्रॉ मधुन पैठण्या दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या पासेस साठी कृपया – 9420635096 / 9823811119 / 7350881515 / या क्रमांकावर फोन करावा असे आवाहन ऋणानुबंधचे सदस्य सचिव सचिन परदेशी यांनी केले आहे.

Exit mobile version