अक्षय कर्डिले यांचा तिसगाव दौरा पार; सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठोस कृतीचे संकेत

Akshay Kardile-लोकांनी मांडलेले प्रश्न केवळ नोंदवण्यासाठी नाहीत. त्यावर ठोस कृती करून निकाल लावणे हीच आपली जबाबदारी आहे.

  • Written By: Published:
Akshay Kardile

Rahuri Assembly By election: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले (Akshay Kardile) यांचा दौरा उत्साहात पार पडला. सिध्दीविनायक मंगल कार्यालय तिसगाव येथे आयोजित बैठकीत विविध गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपल्या समस्या थेट कर्डिले यांच्यासमोर मांडल्या. सकाळपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात तिसगाव, शिरापूर, करडवाडी, घाटशिरस, सोमठाणे, निंबोडी, मांडवे, सातवड, दगडवाडी, देवराई, पारेवाडी, त्रिभुवनवाडी, कौडगाव आठरे, मोहोज खुर्द, मोहोज बु., करंजी, कान्होबावाडी आणि खंडोबावाडी या गावांचा समावेश होता. प्रत्येक गावातील नागरिकांनी पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठा, शेतीसाठी आवश्यक सुविधा, तसेच बेरोजगारीसारख्या मूलभूत प्रश्नांवर जोरदार आवाज उठविला.


प्रश्न केवळ ऐकणार नाही, सोडवणार ;कर्डिले यांचा निर्धार

या बैठकीत बोलताना अक्षयदादा कर्डिले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लोकांनी मांडलेले प्रश्न केवळ नोंदवण्यासाठी नाहीत. त्यावर ठोस कृती करून निकाल लावणे हीच आपली जबाबदारी आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत काही प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढण्याचे आदेश दिले, तर उर्वरित प्रश्नांसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करण्याचे संकेत दिले. ग्रामीण भागात विकासाचा रोडमॅप कर्डिले यांनी यावेळी पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागासाठी विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडला. पाणीपुरवठा योजनांना गती अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा वाढवणे युवकांसाठी रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर त्यांनी प्राधान्याने काम होणार असल्याचे सांगितले.

नागरिकांमध्ये समाधान, पण अपेक्षा कायम
दौऱ्यादरम्यान कर्डिले यांनी थेट संवाद साधल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा दौरा या दौऱ्याकडे राजकीयदृष्ट्याही महत्त्वाने पाहिले जात असून, कर्डिले यांनी थेट जनतेत जाऊन संवाद साधल्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले.

नागरिकांमध्ये अक्षय कर्डिले हे केवळ नेते नसून प्रत्येक कुटुंबाचा सदस्य असल्याची भावना
शिवाजीराव कर्डिले यांनी गेल्या 30 वर्षांत सातत्याने जनतेशी नाळ जोडून ठेवली. प्रत्येकाच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केलं. आता त्याच पद्धतीने अक्षय कर्डिले यांनीही गेल्या 9 वर्षांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत जनतेशी घरगुती नातं निर्माण केलं आहे. अक्षय कर्डिले हे केवळ नेते नसून प्रत्येक कुटुंबाचा सदस्य असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. कोणतेही काम सांगण्याआधीच ते पूर्ण होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

follow us